27 वर्षांपूर्वीचं हे राजस्थानी गाणं गरबा नाईट्समध्ये आजही हिट, हमखास थिरकतात तरूणींचे पाय ; मलायकाचा सुंदर डान्स पाहण्यासारखा !
२७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्यात मलायका अरोरा आणि अरबाज खानची केमिस्ट्री दिसली होती. राजस्थानी लोकसंगीताचा गोडवा आणि वेगवान लय यामुळे हे गाणं आजही दांडिया खेळणाऱ्यांची पहिली पसंती आहे, जो नवरात्रीतील उत्साह द्विगुणित करतो.

शारदीय नवरात्र सुरू होताच देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. सगळ्यांच्या मनात दांडियाचा उत्साह संचारतो. रंगी-बेरंगी कपडे, ढोलाची थाप आणि थिरकणारी पावलं.. या दरम्यान काही गाणी अशी असतात, ज्या विना गरबा नाईट्सची मजा अधुरी असते. बॉलिवूडमधील अशी अनेक गाणी आहेत जी गरब्यासाठी परफेक्ट आहेत आणि आवर्जून वाजवली जातात. पण त्तायच एक गाणं असंही आहे, जे ग्लाय 27 वर्षांपासून वाजतं आणि ते सुरू होताच सगळ्यांची पावलं थिरकू लागतात. या खास गाण्यात मलायका अरोरा आणि अरबाज खानची विशेष केमिस्ट्री देखील दिसून आली होती. ज्येष्ठ गायिका शुभा मुद्गल यांच्या सुरांनी हे गाणं अविस्मरणीय झालं.
राजस्थानी रंगात रंगलंय हे सुपरहिट गाणं
आज आपण ज्या गाण्याबद्दल बोलतोय, ते गाणं म्हणजे ‘रंगीला मारो ढोलना’ (Rangilo Maro Dholna). हे कोणत्याही चित्रपटातील गाणे नसून ‘प्यार का गीत’ या संगीत अल्बममधलं होतं. राजस्थानी शैलीत तयार करण्यात आलेल्या या गाण्यात लोकसंगीताचा गोडवा आणि जबरदस्त ऊर्जा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची वेगवान लय आणि दमदार गायन. गाण्याचे बोल आणि संगीत कानावर पडताच लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. त्यामुळेच अनेक वर्षांनंतरही गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे आवडीने वाजवलं जातं.
अरबाज-मलायकाची तूफान केमिस्ट्री
‘रंगीला मारो ढोलना’ या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान एकत्र दिसले होते. दोघांमधील शनदार केमिस्ट्रीमुळे हे गाणे अधिकच खास बनले. त्या काळात दोघेही पती-पत्नी होते आणि पडद्यावरील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
या गाण्यात केवळ डान्स आणि संगीतच नाही, तर एका पत्नीच्या मनातील भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. या गाण्याची कथा अशा एका महिलेभोवती फिरते, जी आपल्या पतीच्या सुखरूप घरी परतण्याची वाट पाहत असते. तिचा पती सैनिक असतो आणि युद्धभूमीवरून तो सुखरूप परत येईल, या आशेने तिचे मन व्याकूळ झालेले असते. पतीला पुन्हा भेटण्याचा आनंद आणि त्याच्यासाठी मनात असलेली ओढ, या दोन्ही भावना या गाण्यात सुंदरपणे व्यक्त झालेल्या दिसतात. आजंही हे गाणं गरब्यात हमखास वाजतंच.