‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीलाचा ‘पिंगा’ गाण्यावर सुंदर डान्स; तुम्हीही पडाल प्रेमात!

'पिंगा' या गाण्यावर वल्लरीने ठेका धरला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीलाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या वल्लरीला नृत्याची खूप आवड आहे. तिचा सहजसुंदर डान्स नेटकऱ्यांनाही भावला आहे.

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीलाचा 'पिंगा' गाण्यावर सुंदर डान्स; तुम्हीही पडाल प्रेमात!
अभिनेत्री वल्लरी विराजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 11:15 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज आणि राकेश बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेत या दोघांच्या वयात बरंच अंतर असलेलं दाखवलं असलं तरी त्यांच्यामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. यामध्ये वल्लरी ही लीलाची तर राकेश हा एजेची भूमिका साकारतोय. एजे आणि लीला यांच्यातील भांडणं, छुपं प्रेम हे सर्वांना तर प्रेक्षकांना पहायला मिळतंय. पण त्याचसोबत सोशल मीडियावर लीलाचा एक वेगळा अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळतोय. वल्लरीला नृत्याची खूप आवड आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्सचे काही व्हिडीओसुद्धा पहायला मिळतात. नुकताच तिने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात ती ‘बाजीराव मस्तानी’मधील गाजलेल्या ‘पिंगा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

मंगळागौर कार्यक्रमासाठी वल्लरी नऊवारी साडी नेसून, नटून-थटून पोहोचली होती. यावेळी तिने ‘पिंगा’ या गाण्यावर ठेका धरला. तिचा लूक आणि सहज डान्स पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. या डान्सवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘अतिशय गोड दिसत आहेस आणि नृत्याबद्दल तर काय बोलू..’, अशी कमेंट अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली आहे. तर ‘खूप सुंदर डान्स केलास आणि तू खूप सुंदर दिसतेय’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका मुलाखतीत वल्लरीने तिच्या प्रोमोच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि दोन दिवसात तू ऑडिशनला ये असं सांगितलं गेलं. मी जाऊन ऑडिशन दिली आणि तीन-चार दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आहे. राकेश बापटसोबत माझी पहिली भेट एका लूक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतंच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्यासमोर आहेत तर प्रेशर येणारच. कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ते अतिशय साधे आहेत. आमचं लूक टेस्टही छान झालं.”

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.