AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करायचा वॉचमनची नोकरी, त्याचं नशीब चमकलं आणि झाला कोट्यवधींचा मालक

Bollywood | वॉचमनची नोकरी करणारा 'हा' अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक, पण नाही वैवाहिक आनंद, पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा... आज अभिनेता जगतोय रॉयल आयुष्य

'हा' प्रसिद्ध अभिनेता करायचा वॉचमनची नोकरी, त्याचं नशीब चमकलं आणि झाला कोट्यवधींचा मालक
| Updated on: Nov 18, 2023 | 8:18 AM
Share

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याच्या कुटुंबाचं इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. पण सर्वसामान्य घरात जन्म घेतलेल्या अभिनेत्याची स्वप्न फार मोठी होती. अभिनेत्याने कायम त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला. कधीही मागे वळून पाहिलं नाही. थिएटर करत असताना कुटुंबाची भूक भागवण्यासाठी अभिनेत्याने अनेक छोट्या-छोट्या नोकऱ्या केल्या. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या अभिनेत्याचा स्वतःवर असलेला विश्वास त्याला यशाच्या शिखरावर घेऊन आला. आज सर्वसामान्य घरातील मुलगा बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या सिनेमांबद्दल आणि अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता वॉचमनची नोकरी करायचा ही गोष्ट नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या प्रवासाची चर्चा रंगली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. प्रत्येक सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या भूमिकेचं कौतुक सर्वच स्तरातून झालं. चाहते आजही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या कुटुंबाचं इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. पण अभिनेत्याकडे असलेली कला त्याला देवाने दिली आहे… असं म्हणायला देखील काहीही हरकत नाही…

कोणत्याही डायलॉगमध्ये प्राण कसे आणायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी… नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला होता. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर देखील अभिनेत्याने मागे वळून पाहिलं नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी फक्त स्वतःचं काम करत राहिला.

टीव्ही बघत असताना कधी अभिनयाची आवड निर्माण झाली कळलंच नाही… असं वक्तव्य अभिनेत्याने अनेकदा मुलाखतींमध्ये केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याकडे त्याच्या स्वप्नांशिवाय काहीही नव्हतं. पण आज अभिनेता कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नवाजुद्दीन सिद्दीकी याची चर्चा रंगली आहे. अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आज रॉयल आयुष्य जगत आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.