न्यू यॉर्कमध्ये एका सुंदर ‘वेट्रेस’ला पाहून हा बॉलिवूड अभिनेता झाला वेडा; विवाहित असूनही केलं तिच्यासोबत ‘वन नाईट स्टँड’

बॉलिवूडमधील एका सुपरस्टार अभिनेत्याने विवाहित असताना पण एका सुंदर 'वेट्रेस'सोबत चक्क 'वन नाईट स्टँड' केलं होतं. त्याने स्वत:च हा खुलासा केला होता. कोण आहे हा अभिनेता माहितीये?

न्यू यॉर्कमध्ये एका सुंदर वेट्रेसला पाहून हा बॉलिवूड अभिनेता झाला वेडा; विवाहित असूनही केलं तिच्यासोबत वन नाईट स्टँड
nawazuddin siddiqui One-Night Stand
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 05, 2025 | 8:56 PM

बॉलिवूडमध्ये लव्ह-अफेअर किंवा लग्न, घटस्फोटाप्रमाणेच आता ‘वन नाईट स्टँड’ ही पद्धतही फारच सामान्य झाली आहे. ही पद्धत आता बॉलिवूडमध्ये ट्रेंडमध्ये आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी ‘वन नाईट स्टँड’ केल्याचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर अनेक सेलिब्रिटी विवाहित असूनही त्यांनी ‘वन नाईट स्टँड’ केल्याचं कबूल केलं आहे. यात अनेक मोठी नावे समाविष्ट आहेत.

बॉलिवूडच्या अशाच एका बड्या सेलिब्रिटीने त्याची ‘वन नाईट स्टँड’चा किस्सा शेअर केला होता. हा अभिनेता एका सुंदर ‘वेट्रेस’ला पाहून इतका वेडा झाला की त्याने विवाहित असतानाही चक्क तिच्यासोबत ‘वन नाईट स्टँड’ केलं.

नवाजुद्दीनने पुस्तकात केलेत अनेक खुलासे

हा बॉलिवूड अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याने आपल्या मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनची गणना आता सुपरस्टारमध्ये होते. अभिनयाव्यतिरिक्त, नवाजुद्दीन सिद्दीकीने एक पुस्तक देखील लिहिले आहे ज्यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. नवाजुद्दीनने पुस्तकात खुलासा केला होता की 2006 ते 2010 हा काळ त्याच्यासाठी खूप अद्भुत होता. कारण इंडस्ट्रीमध्ये त्याची ओळख निर्माण झाली होती.

पाश्चिमात्य देशांतील लोकही या अभिनेत्याच्या अभिनयावर भाळले होते. नवाजुद्दीनने पुस्तकात खुलासा केला होता की तो एका मित्रासोबत न्यू यॉर्कच्या सोहो भागातील एका कॅफेमध्ये गेला होता. अभिनेत्याने सांगितले की तिथे एक सुंदर वेट्रेस सतत त्याच्याकडे पाहत होती.

ती सुंदर वेट्रेस खूप वेळ त्याच्याकडे पाहत होती

तिने तेव्हा नवाजला विचारले की तो अभिनेता आहे का? नवाजने हो असे उत्तर दिले, आणि तो अभिनेता आहे असं सांगितलं. त्यानंतर त्याने वेट्रेसला विचारले की तू माझा कोणता चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पाहिला आहेस का? तेव्हा वेट्रेसने आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली,”नाही, नाही, दुसरा चित्रपट”

नवाजने थेटच तिला ‘वन नाईट स्टँड’ साठी विचारलं

काही वेळाने वेट्रेसने त्याला सांगितलं की तिने त्याचा ‘लंचबॉक्स’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर नवाज आणि ती वेट्रेसमध्ये अनेक गप्पा झाल्या. त्यानंतर त्याने हावभावात सांगितले की असे म्हणतात की न्यू यॉर्कमध्ये जे घडते ते तिथेच राहते. खरं नंतर, नवाजुद्दीन सिद्दीकीने त्या वेट्रेससोबत ‘वन नाईट स्टँड’ केलं. नवाजच्या या खुलाशाबद्दल जाणून त्याचे चाहते खूप आश्चर्यचकित झाले होते.कारण, चाहत्यांना वाटले की नवाजुद्दीन खूप साधा आहे.

नवाजुद्दीनने अभिनयात करिअर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनय करण्यापूर्वी त्याने वॉचमन म्हणूनही काम केले आहे. अनेक वर्षे ऑडिशन दिल्यानंतर त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण त्याच्या या ‘वन नाईट स्टँड’चा खुलासा त्यानेच केला होता.