अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा!

'शिवप्रताप' नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत अमोल कोल्हे यांची 'जगदंब क्रिएशन्स' वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करणार आहे.

MP Amol Kolhe Big Announcement, अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा!

मुंबई : प्रख्यात अभिनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर आपल्या पुढील वाटचालीबद्दल घोषणा केली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत एकूण तीन चित्रपट येणार असल्याचं जाहीर केलं. अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टमधून मोठ्या घोषणेचं सूतोवाच (MP Amol Kolhe Big Announcement) केल्यानंतर चाहत्यांचं याकडे लक्ष लागून राहिलं होतं.

जगदंब क्रिएशन्स पुढच्या टप्प्यावर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. ‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

‘शिवप्रताप वाघनखं’चा पहिला टीझरही या सोहळ्यात लाँच करण्यात आला. हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2020 च्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार असल्याचं डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, ‘जगदंब क्रिएशन्स’ बॅनरखाली यापूर्वी बंधमुक्त हे नाटक, एक महानाट्य आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या दोन मालिका करण्यात आलेल्या आहेत. या मालिकेच्या प्रवासात ‘झी मराठी’चे मोठे योगदान असल्याचं डॉ. कोल्हे यांनी सांगितलं.

“येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार” अशी फेसबुक पोस्ट 14 डिसेंबरला करत अमोल कोल्हे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला होता. तर, कोणी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असा तर्क लढवला होता. काहींनी 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकून अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. मात्र राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे केंद्रात गेले असले, तरी राज्यात त्यांना शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ येऊ शकते.

MP Amol Kolhe Big Announcement

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *