बॅकग्राऊंडला भगवा रंग, 18 डिसेंबरला मोठी घोषणा, अमोल कोल्हेंची फेसबुक पोस्ट

अभिनेते आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट टाकली (MP Amol kolhe facebook post) आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:59 PM, 14 Dec 2019

मुंबई : अभिनेते आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट टाकली (MP Amol kolhe facebook post) आहे. “येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार” असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या गटात चर्चेला उधाण आले आहे.

अमोल कोल्हे यांनी जवळपास 7 तासांपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यात त्यांनी भगवा रंग बॅकग्राऊंडला ठेवला आहे. “A Big Announcement……On 18 th December!!!” अशी फेसबुक पोस्ट केली आहे. यावर अनेकांनी कमेंट करत अंदाज वर्तवला (MP Amol kolhe facebook post) आहे.

अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला आहे. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असेही काहींना वाटत आहे. विशेष म्हणजे काहींनी 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

कोल्हेंनी आपल्या फेसबुकवरुन पोस्ट करताना, बॅकग्राऊंडचा रंग भगवा निवडला आहे त्यामुळे येत्या 18 डिसेंबरला खासदार अमोल कोल्हे नक्की कोणती घोषणा करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाविकासआघाडीचे सत्तास्थापनेपूर्वी अमोल कोल्हे म्हणाले होते की, महाशिवआघाडीची आधी अधिकृत घोषणा होऊ दे, मग त्यावर चर्चा करु. कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला (MP Amol kolhe facebook post) होता.