कोण आहे Neetu Kapoor यांचा जावई? पत्नीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई, कारण जाणून पोट धरुन हसाल

पत्नीने आपल्यासाठी स्वादिष्ट पदार्थ बनवावे अशी प्रत्येक पतीची इच्छा असते, पण नीतू कपूर यांचे जावई पत्नीला किचनमध्ये देखील जावू देत नाहीत, कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण

कोण आहे Neetu Kapoor यांचा जावई? पत्नीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई, कारण जाणून पोट धरुन हसाल
| Updated on: Apr 12, 2023 | 2:29 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर हिच्या लग्नाला १७ वर्ष पू्र्ण झाली आहेत. रिद्धिमा कायम पती भरत साहनी याच्यावर असलेले प्रेम व्यक्त करतना दिसते. अभिनेत्री नीतू कपूर देखील जावयाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. कपूर कुटुंबासोबत भरत साहनी याचं फार जवळंच नातं आहे. सोशल मीडियावर देखील रिद्धिमा आणि भरत यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी रंगलेल्या असतात. पत्नीने आपल्यासाठी स्वादिष्ट पदार्थ बनवावे अशी प्रत्येक पतीची इच्छा असते, पण नीतू कपूर यांचे जावई पत्नीला किचनमध्ये देखील जावू देत नाहीत. तर रिद्धिमा स्वयंपाक का करत नाही, यामागे देखील एक खास कारण आहे. कारण जाणून तुम्ही देखील पोट धरुन हसाल..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रिद्धिमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. लॉकडाऊन दरम्यान रिद्धिमा गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहायची. लग्नाआधी स्वयंपाक शिकून घे… असा सल्ला रिद्धिमला आई नीतू कपूर यांनी दिला होता. पण लग्नानंतर भरत याने पत्नीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई केली.

रिद्धिमाला विचारलं, ‘गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहिल्यानंतर तू कोणती रेसीपी बनवली? यावर नकार देत रिद्धिमा म्हणाली, ‘मी माझे पती आणि लेकीसाठी पास्ता बनवते आणि दोघांना मी बनवलेला पास्ता प्रचंड आवडतो. जेव्हा मी लग्न करणार होती, तेव्हा आई मला कायम स्वयंपाक शिकून घे असं सांगायची. कारण पंजाबी कुटुंबात जाणार होती… तिकडे सर्वांना नवीन पदार्थ आवडत होते….’

पुढे रिद्धिमा म्हणाली, ‘लग्नानंतर विविध प्रकारचे पदार्थ बनवायची. ज्यामुळे माझ्या पतीचं वजन ९० किलो झालं होतं. म्हणून त्यांनी मला स्वयंपाक करू नको असं सांगितलं. भरतचं सतत वजन वाढत असल्यामुळे मी स्वयंपाक करणं बंद केलं…. मझ्या मुलीला आणि पतीला मी बनवलेले पदार्थ आवडतात. पण त्यांचं वाढतं वजन मी पाहू शकत नाही…’

रिद्धिमा आणि भरत यांच्या मुलीचं नाव समारा साहनी आहे. समारा हिचा जन्म २०११ साली झाला होता. रिद्धिमा सहानी एक उत्तम मुलगी, पत्नी आणि आई आहे. पण घरात तिला स्वयंपाक बनवण्याची परवानगी नाही.

रिद्धिमा कायम तिच्या कुटुंबासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. रिद्धिमाने अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. ती तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.