‘महिलांसोबत वन नाइट स्टँडचे नाते’; ऋषी कपूर यांच्या या गोष्टींना कंटाळल्या होत्या नीतू कपूर, स्वत:च केला खुलासा

अभिनेते ऋषी कपूर यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना नीतू सिंग अक्षरश: कंटाळल्या होत्या. त्या ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांपासून ते वन नाईट स्टँडपर्यंत सर्वच गोष्टींचा नीतू सिंग यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

महिलांसोबत वन नाइट स्टँडचे नाते; ऋषी कपूर यांच्या या गोष्टींना कंटाळल्या होत्या नीतू कपूर, स्वत:च केला खुलासा
Neetu Kapoor Opens Up, Rishi Kapoor Extramarital Affairs & One-Night Stands
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 5:59 PM

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारं घराणं म्हणजे अर्थातच ‘कपूर फॅमिली’. अख्ख्या बॉलिवूडवर कपूर घराण्यानं राज्य केलं आहे आणि आताही करतच आहे. कपूर कुटुंबातील तशा सर्वच जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. ही जोडी जेवढी चित्रपट आणि अभिनयासाठी ओळखली जाते त्याहीपेक्षा ही जोडी त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी ओळखली जाते.

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्यातील नाते कसे होते?

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे लग्न 22 जानेवारी 1980 रोजी झाले. एका चित्रपटादरम्यान दोघांचेही प्रेम झाले. नीतू कपूर आणि पती ऋषी कपूर यांची जोडी ऑनस्क्रिनही तेवढीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायची. पण खऱ्या आयुष्यात या जोडीमध्ये खूप वाद होते. याचा उल्लेख ऋषी कपूर यांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकातही आहे. तसेच स्वत: नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या नात्याबद्दल आणि ऋषी कपूर यांच्या स्वभावापासून ते त्यांच्या एक्स्ट्रामॅरेटीअर अफेअरपर्यंत सर्व काही खुलासे केले होते.

‘मी माझ्या नवऱ्याला १०० वेळा फ्लर्ट करताना पाहिले’

एका मुलाखतीत नीतू सिंग म्हणाल्या होत्या की, “मी माझ्या पतीला 100 वेळा फ्लर्ट करताना पाहिलं आहे. पण लग्नानंतर इतर महिलांसोबतचे प्रत्येक नाते ऋषीसाठी वन नाईट स्टँडसारखे होते. एका मुलाखतीत नीतू कपूर म्हणाली होती की, ‘ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी खूप नाराज होते. आमचे अनेक वेळा भांडणे होत असत. माझे मित्र इंडस्ट्रीतील आहेत, त्यामुळे मलाही सतत फोन येत राहायचे. जेव्हा आउटडोअर शूटिंग झाले तेव्हा मला ऋषी कपूरबद्दलच्या अनेक गोष्टी समजायच्या” असं म्हणत नीतू सिंग यांनी ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितले.


ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांवर नीतू बोलल्या

नीतू सिंग पुढे म्हणाल्या की, ” कालांतराने, मी ऋषीशी बोलणे बंद केले. कारण मला जाणवले की फक्त वन-नाईट स्टँड आहेत, इतर महिलांशी संबंध नाहीत. ऋषी कपूर माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. काहीही झाले तरी, त्यांना कुटुंबच निवडावं लागणारं होतं. यानंतर, मीही त्याकडे लक्ष दिले नाही.”

पुरुषांच्या स्वभावावर नीतू कपूर काय म्हणाल्या 

नीतू कपूर पुढे म्हणाल्या, “जर ऋषी कपूर यांचे कोणत्याही महिलेशी संबंध पुढे गेले असते तर त्यांना घराबाहेर हाकलून लावले असते.”, पुरुषांच्या स्वभावाबद्दल बोलताना नीतू कपूर म्हणाल्या, “फ्लर्टिंग हा पुरुषांचा स्वभाव आहे. म्हणून त्यांना थोडी मोकळीक द्यायला हवी.” ऋषी कपूर आज या जगात नसतील, पण त्यांची नेहमीच चर्चा होते. एवढेच नाही तर चाहते त्यांचे चित्रपट नेहमीच पाहण्यास आवडतात. ऋषी कपूर यांचे 29 एप्रिल 2020 रोजी निधन झाले.