‘ही कोणती फॅशन, टीशर्टवर ब्रा घातली…’ नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क झाले; होतेय प्रचंड ट्रोल

नेहा कक्करचा एअरपोर्टवरील अनोखा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिला तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या या एअरपोर्टवरील अनोख्या लूकवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल पाहून नेटकऱ्यांनी तिला अशा विचित्र स्टाइलचे कपडे न घालण्याचा सल्ला दिला आहे. नक्की नेहाचा हा एअरपोर्ट लूक आहे तरी काय?

ही कोणती फॅशन, टीशर्टवर ब्रा घातली... नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क झाले; होतेय प्रचंड ट्रोल
Neha Kakkar Viral Airport Look
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 11:20 AM

तिच्या गायनाव्यतिरिक्त, नेहा तिच्या फॅशन सेन्स आणि अनोख्या स्टाइलिंगसाठी देखील ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी तिला अनेकदा ट्रोल केले गेले आहे. आता, तिचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींच्या चित्रपटांप्रमाणे, अभिनयाप्रमाणे तसेच त्यांच्या स्टाईलप्रमाणेच त्यांच्या एअरपोर्ट लूकचीही तेवढीच चर्चा होताना दिसते. चाहते देखील सेलिब्रेटींचे एअरपोर्ट लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात. कारण सेलिब्रेटींचा एअरपोर्ट लूक व्हायरल होणं हा एक ट्रेंडच झाला आहे. आता अशाच एका सेलिब्रेटीचा एअरपोर्ट लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ती सेलिब्रेटी म्हणजे नेहा कक्कर.

नेहा कक्करचा ड्रेसिंग सेन्स पाहून लोक थक्क झाले

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर तिच्या गाण्यांनी तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. नेहाने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तिच्या गायनाव्यतिरिक्त, ती तिच्या फॅशन सेन्स आणि विशिष्ट स्टाइलिंगसाठी देखील ओळखली जाते. नेहाला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी अनेकदा ट्रोल केले गेलं आहे. आता, तिचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहाचा ड्रेसिंग सेन्स पाहून लोक थक्क झाले आहेत. तसेच तिला यावरून प्रचंड ट्रोलही केलं जात आहे.


टी-शर्टवर ब्रा घातली

नेहा कक्कर नुकतीच एअरपोर्ट दिसली. तिचा एअरपोर्ट लुकला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. नेहाला तिच्या या लूकबद्दल ट्रोल केलं जात आहे याच कारण म्हणजे तिने घातलेल्या कपड्यांची स्टाईल. तिने राखाडी रंगाची सैल पँट आणि त्यावर मॅचिंग टॉप घातला होता. तथापि, नेहाने त्या टॉपवर काळ्या रंगाच्या ब्रासारखं एक टॉप घातलेला दिसत आहे. तिचा हा लूक जेव्हा व्हायरल झाला तेव्हा तो नेटकऱ्यांना फार विचित्र वाटला. त्यामुळे तिला यावरूनही ट्रोल करण्यात आलं. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

युजर्सच्या कमेंट्स

नेहा कक्करचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर युजर्स कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक युजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ती दिवसेंदिवस अधिकाधिक वेडी होत चालली आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “ही कोणती नवीन फॅशन आहे की टी-शर्टवर ब्रा घातली आहे?” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मॅडम, तुम्ही चुकून बाहेरून ब्रा घातली आहे का?” या व्हिडिओवर अशा अनेक नकारात्मक कमेंट येत आहेत.