झगमगत्या विश्वापासून दूर असूनही दयाबेन हिची संपत्ती थक्क करणारी

सलग ९ वर्ष चाहत्यांचं मनोरंजन करणारी दिशा गेल्या ५ वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. तरीही अभिनेत्री कमावते कोट्यवधींची माया

झगमगत्या विश्वापासून दूर असूनही दयाबेन हिची संपत्ती थक्क करणारी
झगमगत्या विश्वापासून दूर असूनही दयाबेन हिची संपत्ती थक्क करणारी
| Updated on: Jan 16, 2023 | 9:12 AM

TMKOC : एक दोन नाही तर गेल्या १४ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील टप्पूसेना आणि गोकूळधाम सोसायटीमुळे मालिका चाहत्यांच्या मनात आजही अव्वल स्थानी आहे. गेल्या १४ वर्षांमध्ये मालिकेत अनेक बदल झाले. काही बदल चाहत्यांना आवडले नसले, तरी त्यांनी ते झालेले बदल मान्य करत मालिकेवर प्रेम केलं. गेल्या १४ वर्षांपासून मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहेत. मालिकेतील प्रत्येकाची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्यामधील एक म्हणजे दयाबेन अर्थान दिशा वकानी.

सलग ९ वर्ष चाहत्यांचं मनोरंजन करणारी दिशा गेल्या ५ वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. २०१७ मध्ये दिशाने प्रसुतीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर दिशा पुन्हा मालिकेत दिसली नाही. आजपर्यंत चाहते दिशाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढंच नाही तर, अतिस मोदी देखील दिशाला रिप्लेस करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५ वर्षांपासून मालिकेपासून दूर असलेली दिशा कोट्यवधी संपत्तीची मालकिण आहे. दिशाच्या संपत्तीचा आकडा जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. टीव्ही विश्वातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा. दिशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

रिपोर्टनुसार, दयाबेन म्हणजे दिशा वकानी हिची संपत्ती जवळपास ३७ कोटी रुपये आहे. दिशा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या एका एपिसोडसाठी तब्बल दीड लाख रुपये मानधन घ्यायची. दिशा आता झगमगत्या विश्वापासून दूर असली, तर चाहत्यांमध्ये दयाबेन कायम चर्चेत असते. सध्या सर्वत्र दिशाच्या नावाची चर्चा आहे.

दिशा सध्या वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहे. दिशाचं लग्न २०१५ मध्ये मयूर पाडिया यांच्यासोबत झालं. मयूर पाडिया एक चार्टर्ड अकाउंटेंट आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी दिशाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर २०२२ मध्ये दिशाने एका मुलाला जन्म दिला.