आम्हाला माफ कर नताशा; हार्दिक पांड्याचा कारनामा पाहून नेटकरी मागू लागले माफी

क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या मैदानातील खेळीसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. नताशाला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी भारताबाहेर गेला आहे. तिथून त्याने गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

आम्हाला माफ कर नताशा; हार्दिक पांड्याचा कारनामा पाहून नेटकरी मागू लागले माफी
नताशा स्टँकोविक, हार्दिक पांड्या
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2025 | 12:22 PM

भारतीय क्रिकेट टीमचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. नताशा स्टँकोविकला घटस्फोट दिल्यानंतर सतत हार्दिकचं नाव कोणा ना कोणाशी जोडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दिल्लीतल्या एका मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. या मॉडेलचं नाव माहिका शर्मा असं आहे. नुकतंच या दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यानंतर हार्दिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्यासोबतचा बोल्ड फोटो पोस्ट करत स्वत:च रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली आहे. हार्दिक आणि माहिकाचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी नताशाची माफी मागू लागले आहेत.

हार्दिकने 11 ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस त्याने नव्या गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनारी साजरा केला आणि अन् तिच्यासोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. पहिल्या फोटोमध्ये हार्दिक 24 वर्षीय मॉडेल माहिकाच्या गळ्यात हात टाकून समुद्रकिनारी उभा असल्याचं दिसतोय. या फोटोमध्ये माहिका अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. तर दुसरा फोटो हा ब्लॅक अँड व्हाइट आहे. ज्यामध्ये माहिका खुल्लम खुल्ला हार्दिकच्या हातात हात घेऊन उभी आहे. विशेष म्हणजे हार्दिकने या फोटोंवर नजरचा इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे.

नताशाने जेव्हा हार्दिकला घटस्फोट दिला, तेव्हा तिच्यावर अनेक आरोप झाले होते. नताशावर ‘गोल्ड डिगर’ची टीका करत तिने पोटगीसाठीच लग्न केलं होतं, असं म्हटलं गेलं होतं. आता तेच नेटकरी हार्दिकचे फोटो पाहून नताशाची माफी मागत आहेत. ‘जर असा फोटो नताशाने पोस्ट केला असता, तर लोकांनी तिला ट्रोल केलं असतं, आयुष्यभर तिला बरंवाईट बोलले असते’, असं एकाने लिहिलं. तर ‘आम्हाला माफ कर नताशा, लोकांनी कसलाच विचार न करता तुला ट्रोल केलं होतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हार्दिकच्या या नव्या गर्लफ्रेंडचं नाव माहिका शर्मा आहे. ती मॉडेल असून इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे. माहिकाने दिल्लीतच शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्माची एकूण संपत्ती जवळपास 3.2 कोटी रुपयांच्या घरात आहे. नताशा स्टँकोविकला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियासोबत दिसला होता. या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा होत्या. परंतु लगेचच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता हार्दिक माहिकासोबत दिसून येत आहे.