
अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रोल होत असते. तिच्या अभिनयाबद्दलही कायम नेटकी कमेंट्स करत असतात. तसेच तिच्या स्टारकिड्स असण्यावरून देखील बऱ्याचदा तिला सोशल मीडियावर ऐकावं लागतं. अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
अनन्याने फ्लॉन्ट केली टॅनिंग
अलीकडेच अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे वेगळी दिसत आहे. ती टॅन झाल्यासारखी दिसत आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने टाय-डाय केलेला गुलाबी रंगाचा वनपीस ड्रेस घातला आहे.अनन्याचे या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे ते टॅन शरीरामुळे. जे अनन्या अतिशय स्टायलिश आणि हॉट पद्धतीने या फोटोमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अनन्याने या गुलाबी कटआउट ड्रेसमध्ये सोफ्यावर फोटोशूट केलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, तिने बहु-रंगीत स्ट्राइप्ड ब्रा आणि डेनिम शॉर्ट्स घातलेला दिसत आहे.
माझे काही आवडते लूक…
तसेच तिने हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये “तू मेरी मैं तेरा या शीर्षकगीतातील हे माझे काही आवडते लूक आहेत. तुम्ही ते पाहिले आहेत का?” असे लिहिले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. टॅन बॉडी अन् लूकसह तिचा हॉट फोटो लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही चाहत्यांना अनन्याचा लूक खूपच आवडला आहे, तर काहींनी तिच्या टॅन केलेल्या शरीरासाठी तिला ट्रोलही केलं आहे.अनन्याने तिच्या टॅन झालेल्या स्किनचा अनावश्यकपणे अभिमान बाळगू नये. अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.
युजर्सच्या कमेंट्स
एका युजर्सने कमेंटमध्ये लिहिले, “आमच्यावर दया कर, टॅन झालेल्या लूकमध्ये तू चांगली दिसत नाहीयेस” तर एकाने लिहिले, “काळी,” तर दुसऱ्याने लिहिले, “शरीर टॅन का झालंय एवढं.” दरम्यान, काही युजर्सना अनन्याचा लूक हॉट वाटत असून तिच्या फोटोंना, लूकला पसंती दर्शवली आहे. एकाने लिहिले, “वाह, टॅन आवडले,” तर दुसऱ्याने लिहिले, “कांस्य सौंदर्य.”