चित्रपटांपेक्षा ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली; बिझनेसमन,मॉडल ते अनेक अभिनेत्यांना केलं डेट
बॉलिवूड अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिली आहे. बिझनेसमॅन, मॉडेल तसेच अनेक अभिनेत्यांसोबत या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहेत. तसेच या अभिनेत्रीचे एक दोन चित्रपट सोडता बाकी सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे त्यांच्या चित्रपट अन् अभिनयापेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिले आहेत. त्यात अनेक अभिनेत्री देखील अशा आहे, ज्या त्यांच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिल्या आहेत. अशीच एक अभिनेत्री तथा स्टार किड आहे जिला जोहरने तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. तिचे मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आहेत. पण त्यातही ती तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली आहे.
या अभिनेत्रीचे नाव उद्योगपती आणि अनेक चित्रपट कलाकारांशी जोडले गेले
या अभिनेत्रीचे नाव उद्योगपती आणि अनेक चित्रपट कलाकारांशी जोडले गेले आहे. ही अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वी ती करण जयसिंग जो की एक व्यावसायिक आणि कौटुंबिक मित्र आहे. त्याला ती डेट करत असल्याची अफवा पसरली होती. पण त्यावर तिने कधीही भाष्य केलं नाही. तसेच तिचे नाव मॉडेल वॉकर ब्लेकसोबतही जोडले गेले होते. जेव्हा ती त्याच्यासोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदा दिसली होती. मॉडेलसोबतच्या अफेअरच्या अफवांमध्ये अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल चर्चा केल्याचं म्हटलं जात होतं.
या अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं नाव
अनन्या पांडेचे नाव तिचा सहकलाकार कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेले आहे. “पती, पत्नी और वो” या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याच्यासोबतच्या अफेअरच्या अफवा समोर आल्या होत्या. पण यावरही दोघांनीही कधीही भाष्य केलं नाही. त्यानंतर अनन्या पांडेचे नाव “खाली पीली” चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना, तिच्या सह-कलाकार ईशान खट्टरसोबत जोडले गेले होते. त्यांच्या प्रेमाच्या अफवा पसरल्या होत्या. हे दोघे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते असे म्हटले जात होते. ईशान खट्टर नंतर, अनन्याचे आदित्य रॉय कपूरशी अफेअर होते अशा चर्चा होत्या. ही जोडी सुमारे दोन वर्षे डेट करत होती. दोघांना अनेक वेळा एकत्रही पाहिले गेले. 2024 मध्ये त्यांचे नाते संपल्याचे वृत्त आले.
View this post on Instagram
अभिनेत्री पुढील चार ते पाच वर्षात लग्न करण्याचा प्लॅन
दरम्यान आता अनन्या पांडे कोणासोबत रिलेशनमध्ये आहे याबद्दल अद्यापतरी काही अपडेट समोर आली नाही. पण एका मुलाखतीत तिने खुलासा केला की ती पुढील पाच वर्षांत लग्न करणार आहे. तिला तिच्या अभिनय कारकिर्दीत शिखर गाठायचे आहे. सध्या ती तिच्या करिअरकडे लक्ष देत आहे. पण पुढील चार ते पाच वर्षात ती लग्न करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.
अनन्या पांडेच्या कामाबद्दल
अनन्या पांडेचे “ड्रीम गर्ल 2” आणि “केसरी चॅप्टर 2” वगळता, तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. तिने 2019 मध्ये करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर 2” द्वारे पदार्पण केले होते, जो फ्लॉप ठरला होता. दरम्यान, अभिनेत्रीचा चुलत भाऊ अहान पांडे याला “सैयारा” द्वारे स्टार दर्जा मिळाला आहे.
