अनन्या पांडेने केली ओठांची सर्जरी?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांसह शाहरूखच्या लेकीनंही केली कमेंट
अनन्या पांडे सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. पण आता तिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत जे खूप चर्चेत आहेत. तिचे फोटो पाहून तिने सर्जरी केल्यासारखं दिसत आहे. चाहते तिच्या लूकवर खूप कमेंट करत आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहानाने देखील तिच्या लूकवर कमेंट केली आहे.

बॉलिवूडमध्ये चेहऱ्याची सर्जरी करणं, बोटॉक्स करणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक अभिनेत्री त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांच्या ओठांची किंवा नाकाची सर्जरी करतात. काहीचा प्रयत्न सफल होतो तर काहींचा फसतो. आता या यादीत अजून एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अनन्या पांडेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील अनन्याच्या लूकबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. काही जण अनन्याच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर काही जण ट्रोल करत कमेंट करत आहेत.
ओठांवरून कमेंट काहींनी कमेंट करून अनन्याला विचारले की तिची शस्त्रक्रिया झाली आहे का? तर एकाने कमेंट केली की ती आधी चांगली दिसत होती. एवढंच नाही तर शाहरूख खानची लेक सुहाना खानने देखील तिच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. अनन्याच्या या फोटोंवर तिच्या मेकअप आणि लूकचे कौतुक करत ती पॉप स्टारसारखी दिसते अशी कमेंट सुहानाने केली आहे.
याआधीही झालीये ट्रोल याआधीही अनन्याला तिच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आले आहे. अनन्याने स्वतः सांगितले होते की तिला अनेक वेळा बॉडी शेम करण्यात आले आहे. अनन्या म्हणाली होती की, ती जेव्हा 18-19 वर्षांची असताना ती खूपच बारीक होती. सगळे तिची खिल्ली उडवायचे. लोक तिला म्हणायचे अरे, तुला कोंबडीचे पाय आहेत. तू माचिसच्या डब्बीसारखी दिसतेस. तू फ्लॅट स्क्रीन टीव्हीसारखी दिसतेस.
नितंबांच्या शस्त्रक्रियेवर बोलली अनन्या पुढे म्हणाली होती, ‘आता लोक म्हणतात की अरे, आता तिची नितंबांची शस्त्रक्रिया झाली आहे, तिने हे केले आहे. त्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली आहे. की तुम्ही कोणत्याही आकारात असलात तरी लोक तुमच्यावर, विशेषतः महिलांवर, टीका करतच राहणार आहेत. मला वाटत नाही की हे कोणत्याही पुरुषाबद्दल बोललं जातं. महिलांना जास्त द्वेष मिळतो.’
View this post on Instagram
अनन्याची प्रतिक्रिया काय असेल? आता पाहूया की अनन्या तिच्या या लिप सर्जरीच्या कमेंट्सवर प्रतिक्रिया देते की ती त्याकडे दुर्लक्ष करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कामाबद्दल बोलयचं झालं तर अनन्या ती एकामागून एक अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ती शेवटची ‘केसरी 2’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि आर माधवन देखील होते. सध्या अनन्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. ती तू मेरी मैं तेरा, चांद मेरा दिल आणि कॉल मी बे च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.