AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या दोन वर्षांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी'मधून सुरु झालेल्या त्यांच्या प्रेमकहाणीला अचानक ब्रेक लागल्याचे संकेत मिळत आहेत. सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर, अरबाजबद्दल विचारताच निक्कीने 'अजून बरंच काही बाहेर येणार' अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय
Nikki tamboli
| Updated on: Aug 31, 2026 | 8:11 PM
Share

रिॲलिटी शोमध्ये अनेक नाती जोडली जातात, कधी मैत्रीची तर कधी प्रेमाची. पण रिअल आयुष्यात फारच कमी नाती पुढपर्यंत जातात आणि यशस्वी होता. ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये असंच एक नात बनलं आणि पाहता पाहता ती जोडी प्रचंड चर्चेत आली. ते कपल म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaaz Patel) . 2024 साली बिग बॉस मराठीच्या घरातून त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि त्यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा रंगली. अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच ‘द 50’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये ते दोघे दिसले. सोशल मीडियावर दोघांनी रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडल्याचं दिसून आलं.

जवळपास दोन वर्षांपासून त्या दोघांचं नातं होतं, मात्र त्यांच्या नात्यात अचानक मिठाचा खड़ा पडला आणि त्या दोघांचं काही बिनसलं अशी चर्चा सुरू झाली. त्यातच निक्की आणि अरबाज या दोघांनीही सोशल मीडियावर देखील एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ माजली आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं. एकमेकांसोबतचं नातं त्यांनी अधिकृतपणे घोषित केलेलं नसलं तरी सोशल मीडियावर त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे अनेक अंदाज व्यक्त होत आहेत. अरबाजने एक क्रिप्टीक पोस्टही शेअर केली होती, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपबद्दल आणखीनच तर्क-वितर्क व्यक्त करणं सुरू झालं.

अरबाजचं नाव घेताच…

त्यातच आता निक्की तांबोळीचा एका व्हिडीओ समोर आला आहे. काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि तशाच रंगाची ट्राऊझर घातलेली निक्की नुकतीच स्पॉट झाली.पापाराझींनी तिला पटापट कॅमेऱ्यात कैद करायला सुरूवात केली, त्यावेळी त्यांनी तिच्याशी संवादही साधला. वर्कआऊट झालं, सलॉन झालं, सगळं झालं.. आता मी घरी जात्ये असं निक्कीने हसत हसत त्यांना सांगितलं. तेवढ्यात तिला कोणीतरी ‘अरबाज भाई कुठे आहे ? ‘ असा सवाल विचारला.

अजून तर खूप काही बाहेर येणार..

मात्र तो प्रश्न आणि अरबाजचं नाव ऐकताचं निक्कीच्या चेहऱ्यावरचं हसू दिसेनासं झालं. पण तिने क्षणात स्वत:ला सावरलं. ‘याचं उत्तर द्यायला मला आवडणार नाही’ असं म्हणत निक्की तिच्या कारच्या दिशेने चालू लागली. मात्र ती कारमध्ये बसल्यावरही पापाराझी तिला प्रश्न विचारतच होते. बरंच काही ऐकायला येतंय ना.. असं म्हणत त्यांनी तिला पुन्हा प्रश्न विचारला. मात्र त्यावर एकाच वाक्यात उत्तर देत निक्कीने विषय संपवला. ‘आता अजून बरंच काही ऐकायला येईल, बरंच काही बाहेर येईल’ असं ती म्हणाली आणि नंतर ती शांत बसली. तिने आणखी काही बोलण्यास नकार दिला. मात्र तिच्या या प्रतिक्रियेवरून अनेक अंदाज व्यक्त होत असून ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल