Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड

महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही.

Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड
nitish bharadwaj
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:24 AM

मुंबई: महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही. नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षाच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात.

स्मिता गटे या सनदी अधिकारी आहेत. सप्टेंबर 2019मध्येच या दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं. मात्र, त्याबाबत नितीश भारद्वाज यांनी आता खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना नितीश भारद्वाज यांनी स्मितापासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

घटस्फोट मृत्यूपेक्षाही पॉवर फूल

मी सप्टेंबर 2019मध्ये स्मितापासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. आम्ही का वेगळं होत आहोत, त्याबाबत मी बोलू शकत नाही. मात्र, सध्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात पेंडिंग आहे. पण घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते, एवढंच मी सांगू इच्छितो, असं नितीश भारद्वाजने म्हटलं आहे.

विवाह संस्थेवर विश्वास, पण…

माझा लग्न संस्थेवर भरोसा आहे. परंतु, माझ्या नशीबात ते नव्हतं. घटस्फोटाची अनेक कारणे असतात. कधी कधी तुमच्या अॅटिट्यूडशी तुम्ही तडजोड करत नसता, तर कधी कॅम्पेशनची कमी असते. कधी तुमचा अंहकार आडवा येतो तर कधी तुमचे विचार जुळत नाहीत. जेव्हा तुमचे नाते तुटते, तुम्ही विभक्त होता, तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. मुलांवर या गोष्टींचा वाईट परिणाम होतो. त्याला जबाबदार पालकच असतात, असंही त्याने म्हटलं आहे.

नंतर पत्नीशी संपर्क साधला, पण…

जुळ्या मुलींशी संवाद होतो का? असा सवाल केला असता, त्यावर मी काहीच बोलू इच्छित नाही. माझ्या मुलींशी बोलण्याची मला मुभा आहे की नाही यावर मी बोलणार नाही, असं सांगतानाच नातं तुटल्यानंतर मी स्मिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही, असंही त्याने सांगितलं.

संबंधित बातम्या:

धनुष आता रजनिकांतचा जावई नाही राहिला! घटस्फोटासोबत धनुषच्या संसाराविषयीच्या 7 मोठ्या गोष्टी

Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय

Akshra Singh : अभिनेत्री अक्षरा सिंह सिम्पल लूकमध्ये, नेटकरी म्हणाले की…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.