AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना साडी, ना लांब वेणी, अरुंधतीने कात टाकली, ‘आई कुठे काय करते’त नवा लूक

नेहमी साडीत दिसणारी अरूंधती आता चुडीदारमध्ये तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच हेअरस्टाईलमध्ये देखील बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे.

ना साडी, ना लांब वेणी, अरुंधतीने कात टाकली, 'आई कुठे काय करते'त नवा लूक
अरूंधती
| Updated on: Feb 12, 2022 | 7:34 AM
Share

मुंबई – स्टार प्रवाहवरील (star pravah)अनेक मालिकांनी लोकांच्या मनावर किती अधिराज्य गाजवलं आहे, हे वारंवार दिसून आलं आहे. कारण मालिकामधून समाजाला अनेकदा चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न असतो. तसेच तो अनेक लोकांना आवडतो तर काही तुरळक लोकांना खटकतो. पण मालिका पाहण्याचं कोणीही सोडत नाही. स्टारप्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karate) ही मालिका सध्या चांगलीच चाहत्यांच्या पसंतीला उतरली आहे. त्यामुळे त्या मालिकेत काम करणारे कलाकारांचे फॅन्स सुध्दा चांगलेचं असल्याचे पाहायला मिळतात. तसेच त्या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला अधिक आवडतात, म्हणून आज आपण आई कुठे काय करते मालिकेतील अरूंधती (arundhati)विषयी चर्चा करणार आहोत. कारण ती महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय असल्याचे पाहावयास मिळत आहे. अरूंधतीचं मुळं नाव मधुराणी प्रभुलकर (madhurani prabhulkar) असं आहे. तिने अरूंधतीची भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram

A post shared by ??????? ??????? ???? ???? ?? (@marathiserials_official)

अरूंधतीच्या नव्या लुकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ही लोकांच्या इतकी पसंतीला पडली आहे की, अरूधंतीची भूमिका अनेक महिलांना आपली असल्याचे वाटते. विशेष म्हणजे मालिकेत अरूंधती साधी, सरळ आणि संस्कारी आई दाखवली आहे. त्यामुळे अनेक महिलांना ती आपली भूमिका असल्याचे वाटते. त्यामुळे अरूंधतीची भूमिका महिलांना अधिक आवडते. मालिकेमध्ये तिच्यात अनेक बदल होत आहेत. तसेच ती तिच्या हक्कासाठी आता कठोर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच तिच्याकडे असलेल्या कौशल्याचा विचार करून ती त्या गोष्टींना प्राधान्य देत आहे. तसेच आई कुठे काय करते या मालिकेत एक नवा टि्वस्ट निर्माण करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अरूंधतीमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड आहे. तसेच अरूंधतीच्या नव्या लुकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अरूधंतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री 

नेहमी साडीत दिसणारी अरूंधती आता चुडीदारमध्ये तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच हेअरस्टाईलमध्ये देखील बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रत्येकवेळी साडीत एकवेणी घातलेली अरूंधती आता वेगळ्या लुकमध्ये दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागलेली आहे. तसेच तिचा बदलेला मेकओव्हर पाहून मालिकेतला पती अनिरूध्दची काय भूमिका असेल हे सुध्दा पाहणं औत्सुक्याचं ठरेल असं वाटतंय. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर अरूधंतीच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आला आहे. त्यामुळे तसेच तो तिच्या प्रेमात हळूहळू पडत आहे. त्यामुळे मालिकेत आता काय होईल पाहावं लागणार आहे.

शर्टलेस रणवीर, ओलिचिंब दीपिका, बॉलिवूडच्या कूल कपलचा समुद्र किनारी हॉट लिपलॉक

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा म्हणत कंगनाला शबाना आझमीनी दिलं उत्तर…

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.