AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूर नाही ‘ही’ परदेशी महिला असती सैफची दुसरी पत्नी, अभिनेत्याच्या चुकीमुळे…

Kareena Kapoor - Saif Ali Khan: 'ही' परदेशी महिला असती सैफ अली खान याची दुसरी पत्नी, पण..., अभिनेत्याच्या पहिल्या घटस्फोटासाठी नक्की जबाबदार कोण?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ - करीना यांच्या नात्याची चर्चा...

करीना कपूर नाही 'ही' परदेशी महिला असती सैफची दुसरी पत्नी, अभिनेत्याच्या चुकीमुळे...
| Updated on: Sep 21, 2024 | 4:02 PM
Share

अभिनेत्री करीना कपूर हिचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. करीना ही अभिनेता सैफ अली खान याची दुसरी पत्नी आहे. सैफचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. सैफ – अमृता यांना एक मुलगी आणि एक मुलगा देखील आहे. मुलांच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 12 वर्षांनंतर सैफ – अमृता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये सैफ – अमृता यांचा घटस्फोट झाला.

अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या नावाची चर्चा करीना सोबत होऊ लगली. एवढंच नाही तर, करीनामुळेच सैफचा घटस्फटो झाला… अशा चर्चांनी देखील जोर धरला. पण सैफ – अमृता यांच्यामध्ये करीना कधी आलीच नव्हती. अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात परदेशी अभिनेत्री रोझा कॅटालानो हिची एन्ट्री झाली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान एका सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला होता. जिथे अभिनेता रोझा कॅटालानोला भेटला. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पण हे नातं वाचवण्यासाठी सैफ अली खानने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खासगी गोष्टी गर्लफ्रेंडपासून लपवल्या होत्या.

सैफ याचं लग्न झालं असून त्याला दोन मुलं आहेत… हे सत्य रोझा हिला माहिती नव्हतं. जेव्हा रोझा मुंबईत आली तेव्हा तिला सर्व काही कळलं. त्यानंतर सैफ आणि रोझा यांचं नातं संपलं. सैफ आणि रोझा यांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. त्यानंतर रोझा कुठे आहे आणि काय करते याबद्दल काहीही कळलं नाही.

रोझा हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात करीना कपूर हिची एन्ट्री झाली. सैफ – करीना यांनी एकमेकांना 5 वर्ष डेट केलं. त्यानंतर 2012 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. आज करीना कपूर आणि सैफ अली खान एकमेकांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. करीना – सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर आणि लहान मुलाचं नाव जेह असं आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा