Imran Khan Net Worth : भारत सोडण्याच्या नोटिशीनंतर आमिर खानचा भाचा इम्रान खान चर्चेत; कोट्यवधींची संपत्ती, चित्रपटांचं मानधन किती?

अभिनेता इम्रान खान याला भारत सोडण्याची नोटीस मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याची निव्वळ संपत्ती, चित्रपटातून केलेली कमाई आणि वैयक्तिक आयुष्यातील आर्थिक निर्णय चर्चेत आहेत. किती आहे त्याचे नेटवर्थ ?

Imran Khan Net Worth : भारत सोडण्याच्या नोटिशीनंतर आमिर खानचा भाचा इम्रान खान चर्चेत; कोट्यवधींची संपत्ती, चित्रपटांचं मानधन किती?
| Updated on: Oct 15, 2026 | 2:31 PM

Imran Khan : बॉलिवूडमधील अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान पुन्हा चर्चेंच्या केंद्रस्थानी आला आहे. मुंबई पोलिसांतर्फे त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात जे आंदोलन झालं, त्यात सहभागी झाल्यामुळे इम्रानवर ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे. खरंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नाही. त्याच्याकडे ओव्हरिसज सिटिझनशिप ऑफ इंडिया (OCI) कार्ड असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच, ज्यांच्याकडे परदेशी नागरिकत्व आहे, जे OCI कार्डधारक आहेत, त्यांना भारतात आंदोलनाची परवानीग आहे का यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

इम्रानला भारत सोडण्याची नोटीस देण्यात आल्यानतंर त्याचं वैयक्तिक आयुष्य, कमाई आणि संपत्तीबद्दलही लोकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. 2008 साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अभिनेता इम्रान खानची लोकप्रियता रातोरात वाढली होती. मात्र त्यानंतर अवघे काही चित्रट केल्यावर तो फिल्म जगतापासून दूर राहिला. तरीही त्याने रग्गड कमाई केली. त्याची एकूण संपत्ती किती, एका चित्रपटासाठी तो किती फी घ्यायचा आणि फिल्म्सपासून दूर राहिल्यावर, त्याचा खर्च कसा चालतो ? चला जाणून घेऊया.

Loading...

इम्रानचं नेटवर्थ किती?

अभिनेता इम्रान खानच्या नेटवर्थबद्दल अधिकृत आकडेवारी तर समोर नाही. पण काही मीडिया वेबसाईट्सवर त्याचं नेटवर्थ जवळपास 100 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान टाइम्स आणि द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, इम्रानने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की,फिल्म्समध्ये काम सुरू केल्यावर अपेक्षेपेक्षा त्याची कमाई बरीच वाढली. मामा आमिर खानची संपत्ती, त्याची संपत्ती नाही, हेही इम्रानने स्पष्ट केलं होतं. आमिर खानशी नातं असलं तरी त्याची कमाई वेगळी आहे.

फिल्म्समधून किती केली कमाई ?

इम्रान खान हा लहान असतानाच, त्याने 1988 साली ‘कयामत से कयामत तक’ मधून बालकलाकार म्हणून काम सुरु केलं. यात त्याने आमिरच्या लहानपणीची भूमिका निभावली होती. त्यानंतर 1992 साली आलेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ मध्येही तो लहानपणीचा आमिर म्हणून झळकला होता.

इम्रान खानच्या करिअरमध्ये अल्पावधीतच चित्रपटांच्या मानधनात मोठी वाढ झाली. हिंदुस्तान टाइम्सच्या डिसेंबर 2025 मधील वृत्तानुसार, त्याने सांगितलं होतं की, ‘किडनॅप’ या चित्रपटासाठी त्याला केवळ 5 लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर एका चित्रपटासाठी त्याचं मानधन वाढून ७ ते ८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं.

घर आणि महागड्या गाड्यांपासून राहिला दूर

इम्रानच्या संपत्तीमध्ये त्याचे घर आणि गाड्यांचाही समावेश आहे. तो यापूर्वी मुंबईतील पाली हिल परिसरात राहत होता. मे 2024 मध्ये दिलेल्या मुलाखतीत इम्रानने सांगितलं की, त्याने महाराष्ट्रातील कर्जत येथे स्वतःचे घर स्वतःच डिझाइन केले. यासाठी तो 3D मॉडेलिंग शिकला. जमीन खरेदी केल्यानंतर घर बांधण्यासाठी त्याने स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घेतली; मात्र घराची रचना स्वतःच तयार केली. याच काळात त्याने महागड्या गाड्यांपासूनही अंतर राखले. त्याने आपली फेरारी विकली, तर फोक्सवॅगन पोलो GT गाडी स्वतःच्या गरजेनुसार मॉडिफाय करून घेतली होती.

ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून किती कमाई?

चित्रपटांव्यतिरिक्त इम्रानने जाहिरातींमधूनही कमाई केली. द इकॉनॉमिक टाइम्सच्या सप्टेंबर २०१० मधील वृत्तानुसार, त्या काळात तो कोका-कोला आणि लीव्हाइस यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींशी संबंधित होता. इंडस्ट्रीतील अंदाजानुसार, त्याची जाहिरातींमधून होणारी वार्षिक कमाई सुमारे 1 कोटी रुपये असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us