
Nusrat Jahan And Yash Dasgupta Separation: बंगाली अभिनेत्री आणि माजी खासदार नुसरत जहां तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पहिलं लग्न वादाच्या भोवऱ्यात असताना नुसरत जहां हिने दुसरा संसार थाटला आणि बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने मुलाला देखील जन्म दिला. नुसरत जहां हिने दुसरं लग्न अभिनेता यशदास गुप्ता याच्यासोबत केलं. आता नुसरत जहां आणि यशदास गुप्ता यांचा संसार देखील संकटात अडकला आहे. दोघे लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुसरत जहां हिने यशदास गुप्ता याला सोशल मीडिया इन्स्टाग्राम अनफॉलो देखील केलं आहे.
रिपोर्टनुसार, यशदास गुप्ता याने देखील नुसरत याला अनफॉलो केलं आहे. यश आणि नुसरत एकत्र रॅम्प वॉक करणार होते. पण यश रॅम्प वॉकसाठी आला नाही… अशी माहिती देखील समोर येत आहे. एवढंच नाही तर, यशदास गुप्ता पुन्हा एक्सगर्लफ्रेंड पूनम हिच्या संपर्कात असल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र नुसरत जहां आणि यशदास गुप्ता यांच्या वैवाहिक आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नुसरत जहां आणि यशदास गुप्ता यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असताना नुसरतने भगवद्गीतेच्या ओळी शेअर केल्या आहेत. सोशल मीडिया इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या सोडून देणं केव्हाही चांगलं…’
नुसरत जहां आणि यशदास गुप्ता यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव Yishaan असं आहे. नुसरत जहां आणि यश दास गुप्ता बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. दोघांनीही बराच काळ त्यांच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवली होती. दोघांनीही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.
नुसरत जहां कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.