सोनाली ब्रेंदेचा अभिनेता, ज्याने 31 व्या वर्षी संपवलं आयुष्य, गर्लफ्रेंडला अटक आणि…
Love Life: वयाच्या 31 व्या अभिनेत्याची हत्या की आत्महत्या, गर्लफ्रेंडला अटक, अभिनेत्याच्या हत्येला आत्महत्येचं स्वरुप दिल्याचा वडिलांचा दावा... नक्की काय होतं प्रकरण?

Love Life: झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांचं आयुष्य खासगी ठेवतात. पण काही वेळा सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य अशाप्रकारे चव्हाट्यावर येतं ज्यामुळे सेलिब्रिटी स्वतःचं आयुष्ये देखील संपवतात. असंच काही एका अभिनेत्यासोबत झालं आहे. ज्याने अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली होती. पण अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या वडिलांनी आत्महत्या नाही तर, हत्या झाल्याचा दावा करण्यात आला.
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, कुणाल सिंह आहे. कुणालच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता खासगी आयुष्यात सुखी नव्हता. कुणाल याचे अभिनेत्री लविना भाटिया हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अभिनेत्याच्या पत्नीला होता. ज्यामुळे अभिनेत्याच्या पत्नीने घर सोडून दोन मुलींसोबत आईचं घर गाठलं.
7 फेब्रुवारी 2008 रोजी अभिनेत्री लविना भाटिया हिला कुणालचा मृतदेह त्याच्या मुंबईतील राहत्या घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. रिपोर्टनुसार, अभिनेत्याने त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी टीम आणि लविनासोबत एक बैठक घेतली होती. कुणाल याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी लविना हिला ताब्यात घेतलं. कारण तेव्ही ती कुणाल याच्यासोबत घरीच होती.
लविना म्हणाली, ‘मी बाथरुममध्ये गेली होती आणि आली तर कुणाल याचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला.’ लविना विरोधात कोणतेच सबळ पुरावे नसल्यामुळे अभिनेत्रीची सुटका झाली. अभिनेत्याने आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पण तेव्हा चर्चेत आलं जेव्हा कुणाल याचे वडील कर्नल राजेंद्र सिंह यांनी धक्कादायक दावा केला होता. राजेंद्र सिंह यांच्यानुसार, जेव्हा रुग्णालयातून अभिनेत्याचा मृतदेह घरी आणला तेव्हा अभिनेत्याच्या हातावर नस कापल्याच्या जखमा होत्या.
कुणालची प्रथम हत्या करण्यात आली आणि नंतर आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी त्याला फाशी देण्यात आली. असा दावा अभिनेत्याच्या वडिलांनी केला. लविना वॉशरूममध्ये किती वेळ घालवते हे कुणालला कसं कळलं आणि फ्लॅटमध्ये दुसरं कोणीतरी असताना मुलगा आत्महत्या कशी करू शकतो? असे अनेक प्रश्न कुणालच्या वडिलांनी उपस्थित केले होते.
