Raveena Tandon : ‘त्याने कॉलर पकडली त्यानंतर…’, जेव्हा वृद्ध व्यक्तीने रवीनासोबत केलं लाजिरवाणं कृत्य

Raveena Tandon : रवीना टंडन हिच्याकडून मोठा खुलासा, भूतकाळात घडलेल्या धक्कादायक घटनेवर अभिनेत्री झाली व्यक्त, वृद्ध व्यक्तीने रवीना हिच्यासोबत असं काय केलं ज्यामुळे तिला बसला मोठा धक्का... सध्या रवीना टडंन हिचं वक्तव्य चर्चेत...

Raveena Tandon : त्याने कॉलर पकडली त्यानंतर..., जेव्हा वृद्ध व्यक्तीने रवीनासोबत केलं लाजिरवाणं कृत्य
| Updated on: Oct 28, 2023 | 10:04 AM

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला भरभरुन प्रेम दिलं. आज रवीना बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील रवीना टंडन हिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाची चर्चा रंगत आहे. कदाचित अभिनेत्रीच्या अनेक चाहत्यांना याबद्दल काही माहिती देखील नसेल. खुद्द रवीना हिने एका मुलाखतीत वृद्ध व्यक्तीने तिच्यासोबत केलेल्या लाजिरवाणं कृत्यावर मौन सोडलं. ही घटना रवीना हिच्यासोबत शाळेत असताना घडली होती. या घटनेला अनेक वर्ष उलटली आहेत. पण आजही अभिनेत्री विसरु शकलेली नाही.

सिनी ग्रेवाल यांच्या शोमध्ये रवीना हिने मोठा खुलासा केला होता. शाळेतून घरी बसने जात असताना अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली होती. बसमधून जात असताना एका वृद्ध व्यक्तीने रवीना हिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

रवीना म्हणाली, ‘तो वृद्ध व्यक्ती माझ्या बाजूला बसला होता. मी खिडकीच्या बाजूने सरकत होती, पण तो सतत धक्का देत होता. एक मुलगा सर्वकाही पाहात होता. अखेर, त्या मुलाने वृद्ध व्यक्तीची कॉलर पकडली आणि लहान मुलीसोबत हे काय करत आहेस… असं म्हणत वृद्ध व्यक्तीला बजावलं..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा त्या मुलाचे आभार तरी मानायला हवे असं मला वाटलं. पण त्या घटनेनंतर मी अधिक धीट झाली. पण तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि माझं स्टॉप आल्यानंतर मी बसमधून उतरली…’ रवीना हिच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने जमनाबाई नर्सी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं आहे. त्यानंकर मिठीबाई कॉलेजमध्ये अभिनेत्रीने प्रवेश घेतला.

रवीना टंडन हिचे वडील निर्माते होते. अभिनेत्रीच्या आईचं नाव विना सं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, रवीना हिला अभिनेत्री म्हणून करियर करायचं नव्हतं. म्हणून अभिनेत्रीने अनेक आलेल्या संधी नाकारल्या… पण रवीनाच्या नशीबात अभिनेत्रीचं होणंच होतं. आज रवीना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

रवीना टंडन हिचा आगामी सिनेमा

रवीना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, रवीना लवकरच ‘हाऊसफूल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.