AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora चा मराठमोळा लूक, चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका; व्हिडीओ पाहून म्हणाल…

Malaika Arora : 'पारंपरिक ते अधिक सुंदर!', मलायका अरोराच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा; वयाच्या 50 व्या वर्षी देखील दिवसागणिक वाढतंय अभिनेत्रीचं सौंदर्य... मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.... आता मराठमोळ्या लूकमुळे अभिनेत्रीच्या सर्वत्र चर्चा...

Malaika Arora चा मराठमोळा लूक, चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका; व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Oct 28, 2023 | 8:19 AM
Share

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : ९० च्या दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना सुंदर दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक टिप्स देत असतात. आता देखील अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील मलायकाच्या माराठमोळ्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी देखील मलायका हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. मराठमोळ्या अंदाजात मलायका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

मलायका अरोरा बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने इन्स्टाग्राम एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मलायका मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. हातात लाल बांगड्या, कपाळावर चंद्रकोर, केसात माळलेला गजरा… हा मराठमोळा शृंगार अभिनेत्रीवर उठून दिसत आहे.

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मलायका हिच्या लूकची चर्चा रंगत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘पारंपरिक ते अधिक सुंदर!’ असं लिहिलं आहे. चाहते देखील मलायका हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मलायका हिचं खासगी आयुष्य

मलायका गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायका आणि अर्जुन कायम इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये वयाचं अंतर असल्यामुळे दोघांना ट्रोल केलं जातं.

मलायका हिचं पहिलं लग्न अभिनेता अरबाज खान याच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायका – अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका – अरबाज मुलासाठी एकत्र येतात.

Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय