AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला; भडकली होती अभिनेत्री

अभिनेत्या ऐश्वर्या राय बच्चनसोबत रोमँटिक सीन शूट करण्यावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया..

लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला; भडकली होती अभिनेत्री
Ranbir and AishwaryaImage Credit source: YouTube
| Updated on: Feb 28, 2025 | 2:40 PM
Share

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावली होती. त्यांच्या ऑन-स्क्रीन रोमान्सची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. एकदा या चित्रपटासंदर्भात एका रेडिओ मुलाखतीदरम्यान रणबीरने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या रोमान्सबद्दल असे काही सांगितले होते की बच्चन कुटुंबाला देखील राग आला होता. आता रणबीर नेमकं काय म्हणाला होता चला जाणून घेऊया…

‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे काही रोमँटिक सीन दाखवण्यात आले होते. हे सीन शुट करताना रणबीर खूप घाबरला होता. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही त्याला लाज वाटल्याचे त्याने कबूल केले होते. ऐश्वर्या एक अनुभवी आणि व्यावसायिक अभिनेत्री आहे. तिला नैसर्गिक पद्धतीने अभिनय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यामुळे सीन शूट करत असताना तिला सतत ती केवळ अभिनय करत असल्याची जाणीव करुन देण्यात आली होती.

रणबीरने एका रेडिओ चॅनेलला तेव्हा मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तो मजेशीर अंदाजात म्हणाला होता की, ‘त्यावेळी मी विचार केला की, अशी संधी मला कधीच मिळणार नाही. म्हणून मीही जागेवरच चौकार मारला!’ रणबीरचे हे वक्तव्य बच्चन कुटुंबीयांना आवडले नसल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. एका वृत्तपत्राच्या अहवालात असे म्हटले होते की कुटुंबातील एका जवळच्या मित्राने उघड केले की बच्चन कुटुंबाला चित्रपटातील दृश्यांवर कोणताही आक्षेप नव्हता. परंतु त्यांना रणबीरची टिप्पणी चुकीची आणि लाजिरवाणी वाटली. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा मुद्दा समजून घेत रणबीरने लगेचच तो काय बोलला हे स्पष्ट केले होते.

आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असे रणबीर म्हणाला होता. त्याने ऐश्वर्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि तिला एक उत्तम अभिनेत्री तसेच जवळची मैत्रिण असे म्हटले. पीटीआयशी बोलताना रणबीर म्हणाला होता की, ‘ऐश्वर्या भारतातील सर्वात प्रतिभावान महिलांपैकी एक आहे. ए दिल है मुश्कीलमधील तिच्या योगदानाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. मी तिचा असा अपमान कधीच करू शकत नाही.’

विशेष म्हणजे, ऐश्वर्या आणि रणबीर यांची ओळख १९९९ साली झाली होती. रणवीरचे वडील ऋषी कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात ऐश्वर्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होती. या चित्रपटासाठी रणबीरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘ए दिल है मुश्किल’मध्ये त्यांचा बॉन्ड आणखी खास झाला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.