AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan : मध्यरात्री इंटिमेट सीनचं शूटिंग, अचानक रडायला लागली लोकप्रिय अभिनेत्री; म्हणाली, ‘मला खूप…’

Suhana Khan On Intimate Scene : ओटीटी अभिनेत्री सुहाना खाननं इंटिमेट सीनच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. तसेच अभिनेत्रीनं रोमँटिक सीनच्या शूटिंगबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Suhana Khan : मध्यरात्री इंटिमेट सीनचं शूटिंग, अचानक रडायला लागली लोकप्रिय अभिनेत्री; म्हणाली, 'मला खूप...'
| Updated on: Sep 29, 2026 | 5:56 PM
Share

ओटीटी अभिनेत्री सुहाना खानने चित्रपट आणि वेबसीरिजमधील इंटिमेट आणि रोमँटिक सीनच्या शूटिंगबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. अशा सीनचं टिंग करताना कलाकार खरोखरच त्या भावनेत वाहून जातात का, असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांच्या मनात असतो. याबद्दल सुहानाने पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान सांगितलं आहे. तसंच अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला एक प्रसंगही शेअर केला आहे.

इंटिमेट सीनचं शूटिंग एकांतात होत नाही

सुहानानं सांगितलं की, पडद्यावर रोमँटिक किंवा इंटिमेट वाटणारा सीन प्रत्यक्षात शूट करताना सेटवर अनेक लोक उपस्थित असतात. दिग्दर्शक, कॅमेरा आणि प्रॉडक्शन टीमसह अनेक क्रू मेंबर्सच्या उपस्थितीत हे सीन शूट ले जातात.त्यामुळे स्क्रीनवर दिसणारं वातावरण आणि प्रत्यक्ष शूटिंगचं वातावरण यात मोठा फरक असतो. कलाकारांना रोमँटिक क्षणाप्रमाणे वागण्याऐवजी सीनच्या तांत्रिक गरजांवर लक्ष केंद्रित करावं लागतं. कॅमेरा अँगल, लाईटिंग, दिग्दर्शकाच्या सूचना आणि वारंवार घ्यावे लागणारे टेक यामुळे अशा सीनचं शूटिंग हे पूर्णपणे नियंत्रित प्रक्रियेत केलं जातं.

सुहाना खाननं सांगितला प्रसंग

सुहानानं असंही सांगितलं की, इंटिमेट किंवा बोल्ड सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी महिला क्रू मेंबर्सची उपस्थिती असते. डक्शन टीम तसेच इतर संबंधित सदस्य सेटवर उपस्थित असल्यामुळे प्रत्यक्ष शूटिंगचं वातावरण हे प्रेक्षकांना पडद्यावर दिसणाऱ्या रोमँटिक प्रसंगापेक्षा पूर्णपणे वेगळं असते. मात्र, एकदा सुहानाला अत्यंत वाईट अनुभव आलेला. याबद्दल बोलताना सुहाना म्हणाली की, ‘मी ब्लँक होते. मी कशाचाही विचार केला नव्हता. शूट संपल्यावर मला एक विचित्र काहीतरी जाणवलं. मला खूप वाईट वाटलं. मी ती भावना शब्दात सांगू शकत नाही. मला खूप जड वाटत होतं. शूट पहाटे ३ वाजता होत होतं. लोकेशन चांगलं होतं. सगळे झोपले होते. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला काहीतरी जाणवतं. मी रडायला लागले. मग, थोड्या वेळाने मला बरं वाटलं. मी विचार केला, आता मी या इंडस्ट्रीत आहे, तर मी काय करू शकते?

सुहाना म्हणाली की, ‘या बोल्ड इंडस्ट्रीमध्ये तडजोड करण्याची गरज नाही. तिथे कोणी कोणाला जज करत नाही. कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. प्रत्येकजण तुमच्याकडे सकारात्मक नजरेनं पाहतो. आम्ही दिग्दर्शक आणि कॅमेरामनसोबत बिकिनी किंवा नग्न अवस्थेतही सीन शूट करतो. त्यापेक्षा वेगळं असं ते आमच्यात आणखी काय पाहणार? या इंडस्ट्रीत तडजोड करणं गरजेचं नाही. माझ्या मते, प्रत्येकाची स्वतःची निवड असते. मी कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक जवळीक साधू शकत नाही.’ पियुष भूटानीला दिलेल्या मुलाखतीत सुहाना बोलत होती.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय