Bigg Boss OTT | करण जोहरला ‘या’ गोष्टीचा फोमो’, म्हणूनच जाणार नाही ‘बिग बॉस’च्या घरात!

टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा (Bigg Boss 15) नवीन सीझन यावेळी अनोख्या पद्धतीने सादर केला जात आहे. दरवर्षी चाहत्यांना आशा असते की, या शोमध्ये काहीतरी वेगळे आणि खास दिसेल.

Bigg Boss OTT | करण जोहरला ‘या’ गोष्टीचा फोमो’, म्हणूनच जाणार नाही ‘बिग बॉस’च्या घरात!
करण जोहर

मुंबई : टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा (Bigg Boss 15) नवीन सीझन यावेळी अनोख्या पद्धतीने सादर केला जात आहे. दरवर्षी चाहत्यांना आशा असते की, या शोमध्ये काहीतरी वेगळे आणि खास दिसेल. त्याच वेळी, निर्माते देखील प्रत्येक वेळी हा शो अधिक मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि यावेळी टीव्हीच्या आधी हा शो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याचे होस्टिंग निर्माता करण जोहर (Karan Johar) करणार आहे.

एक तासही या घरात राहू शकत नाही : करण जोहर

आपल्‍या अनोख्या शैलीसाठी लोकप्रिय असलेला दिग्‍दर्शक-निर्माता व होस्‍ट करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’च्या मंचावर उत्‍साह निर्माण करण्‍यास सज्‍ज झाला आहे. अखेर प्रतिक्षाकाळ संपला आहे, जेथे भारताचा सर्वात वादग्रस्‍त शो ‘बिग बॉस ओटीटी’साठीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

केजो हा अद्वितीय चित्रपट निर्माता असण्‍यासोबत प्रेमळ ‘बाबा’ देखील आहेत. त्‍याच्‍या सोशल मीडिया हँडलवर यश व रूहीचे अनेक फोटोज व व्हिडीओज आहेत. म्‍हणून त्‍यांच्‍यापासून दीर्घकाळ दूर राहण्‍याचा विचार देखील त्‍याच्‍यासाठी भितीदायक आहे. करणला सर्वात अधिक कशाची भिती वाटते याबाबत विचारले असता इतर पालकांप्रमाणेच तो म्‍हणाला, “माझ्या मुलांपासून दूर राहणे हा माझा सर्वात मोठा फोमो आहे, ते माझ्या आनंदाचे सर्वात मोठे कारण आहेत. त्‍यांच्‍यापासून दीर्घकाळापर्यंत दूर राहणे म्‍हणजे माझ्यात जीव नसल्‍यासारखेच आहे. तसंच मी फोन शिवाय देखील अजिबात राहू शकत नाही. म्हणूनच मी या घरात जाण्याचा विचार देखील करू शकत नाही.”

करण जोहर शोचा मोठा चाहता!

‘बिग बॉस’बद्दल बोलताना करण जोहर म्हणतो की, ‘माझी आई आणि मी बिग बॉसचे मोठे चाहते आहोत आणि एक दिवससुद्धा ते चुकवत नाही. एक प्रेक्षक म्हणून, हा शो माझे खूप मनोरंजन करतो. अनेक दशकांपासून मी बऱ्याच शो होस्टिंगचा आनंद घेतला आहे. मला शो होस्टिंग आवडत होते आणि आता बिग बॉस ओटीटी… ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.’ करण या शोच्या होस्टिंगची आतुरतेने वाट पाहत आहे.

कधी सुरू होणार शो?

करण जाहोर ‘बिग बॉस ओटीटी’ च्या सहा आठवड्यांचे अँकरिंग करणार आहे, जो 8 ऑगस्ट रोजी वूटवर प्रीमियर होईल. डिजिटल एक्स्क्लुझिव्ह पूर्ण झाल्यानंतर, शो नेहमीप्रमाणे कलर्सवर ‘बिग बॉस’च्या सीझन 15च्या प्रक्षेपणासह पुढे जाईल आणि नेहमीप्रमाणे सलमान खान हा शो होस्ट करेल.

(Bigg Boss OTT update The reason behind why Karan Johar is not interested to enter in BB house)

हेही वाचा :

सायली कांबळेमुळे ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पवनदीपने केलं असं काही की, बघणारेही झाले अवाक्!

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बदललं अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचं नातं, अर्जुन म्हणाला- सुरुवातीला आम्ही…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI