रणवीर शाैरी यांचे मोठे भाष्य, थेट सना मकबूलबद्दल म्हणाले, तिची लायकी…

बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले नुकताच पार पडलाय. विशेष म्हणजे सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. सना मकबूल हिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सना मकबूल हिचा फार काही चांगला गेम दिसला नाही.

रणवीर शाैरी यांचे मोठे भाष्य, थेट सना मकबूलबद्दल म्हणाले, तिची लायकी...
Sana Makbul and Ranveer Shayari
| Updated on: Aug 03, 2024 | 2:22 PM

बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता सना मकबूल ही झालीये. मात्र, सना मकबूल ही विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. कारण बिग बॉसच्या घरात सना मकबूल ही फार काही चांगला गेम खेळताना दिसली नाही. फक्त हेच नाही तर सतत घरातील इतर सदस्यांच्या विरोधात पाठीमागून बोलतानाही सना मकबूल ही दिसली. सना मकबूल ही विजेता झाल्यानतंर चाहतेही नाराज झाल्याचे बघायला मिळतंय. फक्त लोकच नाही तर बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालेले काही स्पर्धेकही नाराज झाल्याचे बघायला मिळाले. आता सना मकबूल हिच्या विजयानंतर रणवीर शाैरीने मोठे भाष्य केले आहे.

बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर पडल्यानंतर रणवीर शाैरी यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना ते दिसले आहेत. रणवीर शाैरी हे म्हणाले की, मला वाटत नाही की, सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 च्या विजेतेपदाच्या लायकीची होती…पण ठिक आहे…बिग बॉस आणि वोटिंगचा सन्मान करावा लागतो.

मुळात म्हणजे मला अगोदरपासूनच माहिती होती की, माझी वोटिंग खूप जास्त चांगली नाहीये. कारण मी कोणत्याही पीआर टीमशिवाय बिग बॉसच्या घरात दाखल झालो होतो. मला वाटते की, मी चांगले केले असावे, त्यामुळे मी टॉपर्यंत पोहोचू शकलो. यावरून हे स्पष्ट झाले की, कोणीही सांगू शकत नाही की, इथे बिग बॉसमध्ये कधी काय होईल.

विशेष म्हणजे सनाच्या विजयानंतर ही गोष्ट तर अजून स्पष्ट झाली. मुळात म्हणजे बिग बॉसच्या घरात रणवीर शाैरी आणि सना मकबूल यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसले. नेहमीच सना मकबूल ही रणवीर शाैरी यांना टार्गेट करताना दिसली. एका भांडणामध्ये तर रणवीर शाैरीबद्दल अत्यंत चुकीचे भाष्य करतानाही सना मकबूल ही दिसली.

रणवीर शाैरी हे बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसले. विशेष म्हणजे सर्वांनाच वाटत होते की, रणवीर शाैरी हेच बिग बॉसचे विजेता होतील. मात्र, तसे झाले नाही. टॉप 3 पर्यंत पोहोचण्यात रणवीर शाैरी यांना यश मिळाले. रणवीर शाैरी यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे रणवीर शाैरीचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.