Hum Do Hamare Do Teaser | पालकांनाच दत्तक घेण्याची हटके कथा, राजकुमार आणि क्रितीच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज

‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे, ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. हा चित्रपट 29 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Hum Do Hamare Do Teaser | पालकांनाच दत्तक घेण्याची हटके कथा, राजकुमार आणि क्रितीच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज
Rajkummar-Kriti
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 1:17 PM

मुंबई : दिनेश विजान आपल्या प्रॉडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयार आहे. ‘स्त्री’ आणि ‘लुका छुपी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिनेशच्या आगामी ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात राजकुमार राव, क्रिती सेनन, परेश रावल, अपारशक्ती खुराना आणि रत्ना पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे, ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. हा चित्रपट 29 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. टीझरबद्दल बोलायचे झाल्यास, असे दिसून येते की, राजकुमार राव आणि क्रिती सेनन हे दोघे कपल आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न करू इच्छितात.

कथा देखील मजेदार!

एक दिवस, क्रिती राजकुमारकडे येते आणि त्याला सांगते की त्याच्या आई-वडिलांना घरी घेऊन ये, तिच्या घरच्यांना लग्नाच्या बोलणीसाठी त्यांना भेटायचे आहे. हे ऐकल्यावर राजकुमाराचे मन भरकटते, कारण त्याला पालक नाहीत, तो अनाथ आहे. येथून, परेश रावल आणि रत्ना पाठक यांच्या एंट्रीने कथेत एक ट्विस्ट येतो. पालकांना दत्तक घेण्याची ही कथा आहे, जी प्रेक्षकांना खूप गुदगुल्या करणार आहे.

‘हम दो हमारे दो’चा टीझर येथे पहा

‘हम दो हमरे दो’चा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी, क्रिती आणि राजकुमारने आपापल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाची पहिली झलक दाखवली. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे जमिनीवर बसलेले दिसले. राजकुमार रावने केशरी स्वेटशर्ट आणि डेनिम घातले होते आणि लूकबद्दल काय बोलावे, तो खूप रागावला होता. दुसरीकडे, क्रिती डूंगरीत दिसली आणि थोडी गोंधळली. प्रेक्षकांना चित्रपटाचे हे पोस्टर खूप आवडले. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

Arvind Trivedi Died : लाडक्या ‘रावणा’ला निरोप देताना कलाकारही झाले भावूक, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली!

Mrunmayee Deshpande : ‘नखरा’ म्हणत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केले खास फोटो, पाहा मराठमोळ्या अंदाजातील सुंदर लूक

Arvind Trivedi Death | रामायणात साकारायचे होते ‘हे’ पात्र, योगायोगानेच अरविंद त्रिवेदींच्या वाट्याला आली ‘रावणा’ची भूमिका!

Amruta Khanvilkar | ‘तुम सबसे हसीन….’, अमृता खानविलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!