Arvind Trivedi Death | रामायणात साकारायचे होते ‘हे’ पात्र, योगायोगानेच अरविंद त्रिवेदींच्या वाट्याला आली ‘रावणा’ची भूमिका!

सुप्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi ) यांनी आज या जगाचा निरोप घेतला. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात.

Arvind Trivedi Death | रामायणात साकारायचे होते ‘हे’ पात्र, योगायोगानेच अरविंद त्रिवेदींच्या वाट्याला आली ‘रावणा’ची भूमिका!
Arvind Trivedi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Oct 06, 2021 | 10:29 AM

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi ) यांनी आज या जगाचा निरोप घेतला. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात.

अरविंद त्रिवेदीने हे पात्र इतक्या तल्लखपणे साकारले, हे पाहून प्रत्येकजण अजूनही असे म्हणतात की, त्यांच्याशिवाय इतर कोणीही हे पात्र साकारू शकले नसते. पण तुम्हाला माहित आहे का की, अरविंद त्रिवेदी यांनी लंकेशच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले नव्हते. पण त्यांना रामायणातील एक दुसरेच पात्र साकारायचे होते.

कशी मिळाली अरविंद त्रिवेदींना रावणाची भूमिका?

लंकेश म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अरविंद त्रिवेदीच्या चाहत्यांना कदाचित माहित नसेल की, अभिनेत्याला रावणाचे पात्र साकारायचे नव्हते आणि ते केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी रामानंद सागर यांच्याकडे पोहोचले होते. रामायणात ‘केवट’ नावाचा हा नाविक भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात गंगा ओलांडण्यास मदत करतो.

अरविंद त्रिवेदी यांनी स्वतः एकदा त्यांच्या एका मुलाखतीत रावणाची भूमिका कशी मिळाली, हे उघड केले होते. केवटच्या भूमिकेसाठी आपण ऑडिशनला गेलो होतो, असे त्यांनी सांगितले होते. जेव्हा ते केवटच्या ऑडिशनला गेले होते, तेव्हा फक्त काहीच वेळात रामानंद सागर यांनी सांगितले की, त्यांना त्यांचा लंकेश म्हणजेच रावण सापडला आहे आणि नंतर सुदैवाने त्यांना रामायणातील रावणाची ही आयकॉनिक भूमिका करण्याची संधी मिळाली.

‘रावणा’ची भूमिका साकारल्यानंतर त्याची टीव्ही इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनली होती. या भूमिकेमुळे तो इतका लोकप्रिय झाले की, घरोघरी मुले त्यांच्यासारखी वागायला लागली. लंकेश हैं हम… म्हणण्याची त्यांची शैली प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. संवाद म्हणण्याची त्यांची शैली आजही लोकांच्या आठवणीत आहे. असे म्हटले जाते की, अरविंद त्रिवेदीने आपल्या कारकिर्दीत फक्त एका रावणाची भूमिका केली होती, ती नकारात्मक होती. याआधी त्यांनी गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुमारे 250 चित्रपट केले होते, परंतु या सर्वांमध्ये ते अतिशय सकारात्मक भूमिकेत दिसले. अरविंद त्रिवेदी गुजराती चित्रपटात अधिक सक्रिय होते.

निधनाच्या अफवा

कोरोना लॉकडाऊनच्या काळात रामायण ही मालिका टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. त्या काळात अरविंद त्रिवेदी आजारी असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. अरविंद त्रिवेदींच्या मृत्यूच्या अफवा या वर्षी मे महिन्यातही उठल्या होत्या, पण त्यावेळी पुतणे कौस्तुभ यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देत खोटे वृत्त न पसरवण्याची विनंती केली होती.

भाजपची खासदारकी

अरविंद त्रिवेदींनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.

हेही वाचा :

वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल

आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना, राजकारणातही आजमावले नशीब!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें