AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Khanna Birth Anniversary | आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना, राजकारणातही आजमावले नशीब!

अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जात असत. खलनायकाची भूमिका असो किंवा नायक किंवा कोणतेही इतर पात्र, विनोद खन्ना यांनी प्रत्येक पात्र पडद्यावर जिवंत केले आहे.

Vinod Khanna Birth Anniversary | आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना, राजकारणातही आजमावले नशीब!
Vinod Khanna
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 7:03 AM
Share

मुंबई : अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जात असत. खलनायकाची भूमिका असो किंवा नायक किंवा कोणतेही इतर पात्र, विनोद खन्ना यांनी प्रत्येक पात्र पडद्यावर जिवंत केले आहे. आजही विनोद खन्ना त्यांच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली होती आणि ओशो रजनीश यांचे भक्त बनले होते. त्याच वेळी शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन देखील आपल्या कारकिर्दीच्या उंचीवर चढत होते. म्हणूनच अनेकांचे असे म्हणणे आहे की, जर त्या वेळी विनोद खन्ना यांनी माघार घेतली नसती, तर  त्या काळात अमिताभ यांना जे यश मिळाले ते विनोदच्या वाट्याला आले असते.

पाकिस्तानात झाला जन्म

विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद खन्ना आणि आईचे नाव कमला होते. त्याच्या वडिलांचा कापड आणि रसायनाचा व्यवसाय होता. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून भारतात आले.

विनोद खन्ना यांचे सुरुवातीचे शिक्षण क्वीन मेरी स्कूल, मुंबई येथे झाले. यानंतर, जेव्हा त्यांचे कुटुंब 1957 मध्ये दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड येथे शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी मुघल-ए-आझम चित्रपट पाहिला आणि त्यांन मनोरंजन विश्वाची ओढ लागली. त्यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केली.

सुनील दत्तच्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण

1968 मध्ये विनोद खन्ना यांनी सुनील दत्तच्या ‘मन का मीत’ चित्रपटात पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर प्रवेश केला. यानंतर त्यांनी  अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यांनी ‘मेरा गाव मेरा देश’, ‘रामपूर का लक्ष्मण’ आणि ‘आन मिलो सजना’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या नकारात्मक पात्राने लोकांचे मनोरंजन केले. त्या वेळी विनोद खन्ना यांना खलनायकी वेषात पाहण्याचा एक वेगळाच आनंद होता. 1970 मध्ये, विनोद खन्ना मनोज कुमार यांच्या ‘पूरब और पश्चिम’ या सुपरहिट चित्रपटातही दिसले होते.

1971 मध्ये गुलजार यांनी विनोद खन्ना यांना सुपरहिट नायिका मीना कुमारी यांच्या सोबत त्यांच्या ‘मेरे अपने’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटात विनोद खन्ना यांनी सिद्ध केले की, ते केवळ खलनायकाची भूमिका करू शकत नाहीत, तर ते एक मजबूत अभिनेता देखील आहेत. यानंतर, यशाने त्यांच्या पायाशी लोळण घातली.

अनेक सुपरहिट चित्रपटात काम

यानंतर, त्यांनी ‘इंकार’, ‘आप की खातीर’, ‘परवरीश’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 1980 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट रिलीज झाला, ज्याचे नाव होते ‘कुर्बानी’, ज्यामुळे ते तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले.

अभिनयातून निवृत्ती

1979 मध्ये, जेव्हा त्यांची कारकीर्द शिगेला पोहोचली, तेव्हा ते निवृत्त झाले आणि रजनीश ओशो यांचे भक्त झाले. तब्बल आठ वर्षे फिल्मी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर ते पुन्हा सिनेमा विश्वाकडे वळले. ‘दयावान’, ‘चांदनी’, ‘क्षत्रिय’ यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी दाखवून दिले की, त्यांच्याकडे अजूनही अभिनयाची क्षमता आहे.

1997 मध्ये त्यांनी ‘हिमालय पुत्र’ चित्रपटाची निर्मिती केली, ज्याद्वारे त्यांनी त्यांचा मुलगा अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्नाची कारकीर्दही बनली नाही. अभिनय क्षमता असूनही अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये आवश्यक ते स्थान मिळाले नाही.

हेही वाचा :

Video | छोट्या मुलाने शहनाज गिलला प्रश्न विचारले, समोर आलेले उत्तर पाहून ‘Sidnaaz’चे चाहते भावूक झाले!

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...