Video | छोट्या मुलाने शहनाज गिलला प्रश्न विचारले, समोर आलेले उत्तर पाहून ‘Sidnaaz’चे चाहते भावूक झाले!

चाहत्यांना अशीही आशा होती की, एक दिवस असाही येईल जेव्हा शहनाजचे नाव शहनाज कौर गिल नाही तर, 'शहनाज कौर गिल शुक्ला' असेल. पण नियतीच्या फेऱ्यामुळे हे होऊ शकले नाही. आता असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात शहनाज कौर गिल हिच्या नावासमोर शुक्ला देखील दिसले आहे.

Video | छोट्या मुलाने शहनाज गिलला प्रश्न विचारले, समोर आलेले उत्तर पाहून ‘Sidnaaz’चे चाहते भावूक झाले!
Sidnaaz
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Oct 05, 2021 | 7:14 PM

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे निधन होऊन आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, पण तरीही त्यांच्या जाण्याचे दुःख चाहत्यांना आजही विसरता आलेले नाही. त्याची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) आतापर्यंत ना सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे आणि ना त्याच्या मृत्यूनंतर तिने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली आहे. त्यांच्या मैत्रीला चाहत्यांनी ‘सिडनाज’ असे नाव दिले होते. चाहते सोशल मीडियावर या दोघांच्या आठवणी सतत शेअर करत असतात. प्रत्येकालाच से वाटत होते की या जोडीचे एकमेकांवर प्रेम आहे, आणि असेही म्हटले जात होते की सिद्धार्थ आणि शहनाज यांनी लग्नाचे नियोजनही केले होते आणि तयारी, बुकिंगही सुरू झाले होते.

चाहत्यांना अशीही आशा होती की, एक दिवस असाही येईल जेव्हा शहनाजचे नाव शहनाज कौर गिल नाही तर, ‘शहनाज कौर गिल शुक्ला’ असेल. पण नियतीच्या फेऱ्यामुळे हे होऊ शकले नाही. आता असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात शहनाज कौर गिल हिच्या नावासमोर शुक्ला देखील दिसले आहे. खुद्द शहनाज देखील एका लहान मुलाला हा खेळ खेळताना पाहून आश्चर्यचकित झाली होती.

‘गेस द कॅरेक्टर’ खेळत शहनाज बनली शुक्ला!

सध्या चर्चेत असलेला हा व्हिडिओ शहनाज गिलच्या आगामी ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शहनाज गिलच्या ‘हौसला रख’ या चित्रपटातील बालकलाकार शिंदा ग्रेवाल यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये शहनाज गिल व्यतिरिक्त चित्रपटाचे क्रू मेंबर्स एकत्र कॉफी पिताना दिसत आहेत. त्याच वेळी, शहनाज शिंदा ग्रेवालसोबत ‘गेस द कॅरेक्टर’ गेम खेळत आहे.

यामध्ये शिंदा शहनाजला काही प्रश्न विचारते आणि ती सर्व उत्तरे देत आहे. शहनाझने दिलेल्या उत्तरांनुसार, अॅपने तिला ‘शहनाज कौर गिल शुक्ला’ असे नाव दिले आहे. तिचे पूर्ण नाव शहनाज कौर गिल शुक्ला वाचून शहनाज देखील खूप हसते.

पाहा व्हिडीओ :

शहनाजचा हा व्हिडीओ ‘सिडनाज’ च्या चाहत्यांना अतिशय भावनिक करणारा आहे. बरेच चाहते कमेंट सेक्शनमध्ये लिहित आहेत की, ‘आमची हीच इच्छा होती की हे खरे व्हावे.’ तसेच, अभिनेत्री शहनाज गिल 7 ऑक्टोबरपासून ‘हौसला रख’ च्या प्रमोशनल गाण्याचे शूटिंग सुरू करणार आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या दुःखातून सावरत ती पुन्हा एकदा कामावर परतणार आहे.

हेही वाचा :

Aryan Khan Drug Case: कुणी मेकअप आर्टिस्ट तर कुणी शिक्षक, पाहा आर्यन खानसोबत आणखी कोणकोण अटकेत?

Amruta Khanvilkar | ‘तुम सबसे हसीन….’, अमृता खानविलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें