Video : ‘मिसमॅच्ड’ सीझन 2 चं शूटिंग सुरू, रोहित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक

अभिनेता रोहित सराफनं आता  'मिसमॅच्ड' सीझन 2 चं शूटिंग सुरू केलं आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर आता वेब सीरीजच्या टीमनं मंगळवारपासून त्याचं शूटिंग सुरू केलं आहे. (Shooting of 'Mismatched' Season 2 begins, fans eager to see the chemistry of Rohit Saraf and Prajakta Koli)

Video : 'मिसमॅच्ड' सीझन 2 चं शूटिंग सुरू, रोहित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक

मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरीजचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता अनेक कलाकार याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, आता ‘लुडो’ आणि ‘मिसमॅच्ड’ (Mismatched) या वेब सीरीजमध्ये झळकलेला प्रसिद्ध अभिनेता रोहित सराफनं आता  ‘मिसमॅच्ड’ सीझन 2 (Mismatched Season 2) चं शूटिंग सुरू केलं आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर आता वेब सीरीजच्या टीमनं मंगळवारपासून त्याचं शूटिंग सुरू केलं आहे. ही संपूर्ण मालिका संध्या मेनन यांच्या “जब मिले डिंपल और ऋषी” (When Dimple Met Rishi) या सुंदर पुस्तकावर आधारित आहे. आपण या मालिकेच्या दुसऱ्या भागात रोहित (Rohit Saraf) आणि प्राजक्ता कोळीला (Prajakta Koli) एकत्र भेटणार आहोत.

नुकतंच रोहितनं या वेब सीरीजशी संबंधित पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या हंगामात रोहितसोबत असलेले सर्व कलाकार दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रोहितनं लिहिलं, “रोहितचा’ 60’s वाला रोमान्स पुन्हा एकदा परत येण्यास सज्ज आहे, आशा आहे की तुम्ही सगळे त्यासाठी तयार आहात, ‘मिसमॅच्ड’ सीझन 2 चे शूटिंग आता सुरू झालं आहे.” आरएसव्हीपी प्रॉडक्शननं नुकतंच सोशल मीडियावर या सीरीजच्या स्टार्सचा फोटो शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)

‘मिसमॅच्ड’ मध्ये दिसल्यानंतर रोहितचं नशीब चमकलं. आता प्रेक्षकांना तो खूप आवडतो. त्याला आता भारताचा राष्ट्रीय क्रश देखील म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत, त्याने झूमसोबत बोलताना सांगितलं होतं की “हा खूप चांगला काळ आहे, मला हे सर्व खूप आवडत आहे. जेव्हा मी ऐकले की लोक मला आता राष्ट्रीय क्रश म्हणतात, तेव्हा खूप वेगळं वाटतं. पूर्वी मला असं वाटत होतं की हा फक्त एक इंटरनेट ट्रेंड आहे, पण आता जेव्हा प्रत्येकजण माझ्याशी याबद्दल बोलतो तेव्हा असं वाटतं की ही एक गंभीर समस्या बनली आहे.

पुढच्या वर्षी नेटफ्लिक्सवर रोहित आणि प्राजक्ताचा हा ‘मिसमॅच्ड’ सीझन 2 आपल्याला पाहायला मिळेल, ज्यासाठी ही टीम आता तयारी करत आहे. त्याचबरोबर ही बातमी आल्यानंतर मालिकेची संपूर्ण टीम खूप उत्साही आहे. आता या सीरीजमध्ये काय नवीन पाहण्याची संधी मिळते हे पाहण्यासारखं असेल. रोहित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Films : ‘या’ बिग बजेट चित्रपटांवर काम सुरू; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकरांची भेट होते! ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर बिग बींची हजेरी!

Rhea Kapoor : ‘मला चार लोकांचे आभार मानायचे आहेत’, करण बूलानीची लग्नानंतर रियासाठी खास पोस्ट

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI