AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs New Zealand T20I LIVE Score: भारताने न्यूझीलंडला 8 विकेटने केलं पराभूत, मालिका जिंकली

| Updated on: Jan 25, 2026 | 10:57 PM
Share

India vs New Zealand T20I highlight Cricket Score and Updates in Marathi: भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडे 154 धावांचंं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य 10 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं.

India vs New Zealand T20I LIVE Score:  भारताने न्यूझीलंडला 8 विकेटने केलं पराभूत, मालिका जिंकली

भारताने न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पराभूत केलं. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यातच मालिका खिशात घातली. या मालिकेतील उर्वरित दोन सामने आता औपचारिक असणार आहेत. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Jan 2026 09:41 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: भारताने टी20 मालिका जिंकली

    भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील सुरुवातीचे तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं. हा सामना भारताने 8 विकेटने जिंकला.

  • 25 Jan 2026 09:36 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवचा झंझावात, विजयाच्या दिशेने कूच

    अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आला चेंडू की सीमेपार पाठवला असा हेतू स्पष्ट होता. तिसऱ्या विकेटसाठी 90हून अधिक धावांची भागीदारी केली.

  • 25 Jan 2026 09:23 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: अभिषेक शर्माचं अर्धशतक

    अभिषेक शर्माने 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने टी20 मधील दुसरं वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

  • 25 Jan 2026 09:22 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: पावरप्लेमध्ये भारताच्या 2 गडी 94 धावा

    भारताने पावरप्लेच्या 6 षटकात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळूनही न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांना काही रोखता आलं नाही. भारताने 6 षटकात 2 गडी गमवून 94 धावा केल्या. यात 14 चेंडूत अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 25 Jan 2026 09:08 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: इशान किशन बाद

    संजू सॅमसन बाद झाल्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी केली. त्याने 13 चेंडूत 28 धावा केल्या आणि टीम इंडियाला सावरलं. इशा सोढीच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला.

  • 25 Jan 2026 09:07 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: इशान किशन आणि अभिषेक शर्माने डाव सावरला

    पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट पडल्यानंतर इशान किशन आणि अभिषेक शर्माने डाव सावरला. या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: धुतलं. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली.

  • 25 Jan 2026 08:50 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: भारताला पहिलाच धक्का, संजू सॅमसन गोल्डन डकवर बाद

    भारताला पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनच्या रूपाने धक्का बसला आहे. संजू सॅमसन गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं पुढे कठीण होणार आहे.

  • 25 Jan 2026 08:37 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं लक्ष्य, अभिषेक शर्माच्या फलंदाजीकडे लक्ष

    न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमवून 153 धावा केल्या. तसेच विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हा सामना कोण जिंकेल याकडे लक्ष लागून आहे. तसं पाहिलं तर या मैदानावर ही धावसंख्या खूपच कमी आहे. आता भारतीय फलंदाज किती षटकात हे आव्हान पूर्ण करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

  • 25 Jan 2026 08:32 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: मिचेल सँटनर बाद, न्यूझीलंडला नववा धक्का

    मिचेल सँटनरच्या रुपाने न्यूझीलंडला नववा धक्का बसला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला पण सीमेजवल अभिषेक शर्माने झेल पकडला.

  • 25 Jan 2026 08:25 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: मॅट हेन्री धावचीत

    कायल जेमिसन बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या षटकात आणखी एक धक्का बसला. मॅट हेन्री दोन धावा घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याच्या रूपाने न्यूझीलंडला आठवा धक्का बसला.

  • 25 Jan 2026 08:22 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला सातवा धक्का, जेमिसन त्रिफळाचीत

    न्यूझीलंडची सातवी विकेट जसप्रीत बुमराहने काढली. कायल जेमिसन फक्त 3 धावा करून तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत केलं.

  • 25 Jan 2026 08:14 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला सहावा धक्का, डॅरेल मिचेलनंतर फिलिप्स बाद

    हार्दिक पांड्याने डॅरेल मिचेलची विकेट काढल्यानंतर त्याच्या नंतरच्या षटकात रवि बिश्नोईने फिलिप्सची विकेट काढली. ग्लेन फिलिप्स 40 चेंडूत 48 धावा करून बाद झाला.  या विकेटमुळे न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक बसला.

  • 25 Jan 2026 08:10 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला पाचवा धक्का, डॅरेल मिचेल बाद

    न्यूझीलंडला डॅरेल मिचेलच्या रूपाने पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं. 8 चेंडूत 14 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर विकेट टाकली. इशान किशनने त्याचा झेल पकडला.

  • 25 Jan 2026 07:56 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला चौथा धक्का, चॅपमनला बिश्नोईने पाठवलं तंबूत

    न्यूझीलंडला मार्क चॅपमनच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. चॅपमन आणि फिलीप जोडी जमली होती. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. हे काम रवि बिश्नोईने केलं. चॅपमनला टाकलेला चेंडू कळलाच नाही आणि  संजू सॅमसनच्या हाती झेल देत बाद झाला.

  • 25 Jan 2026 07:45 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: 10 षटकात न्यूझीलंडच्या 3 बाद 75 धावा, फिलिप-चॅपमनने डाव सावरला

    न्यूझीलंडला पावरप्लेमध्ये धक्का बसला होता. सहा षटकात 3 गडी गमवून 36 धावा केल्या होत्या. पण पुढच्या चार षटकात फिलिप-चॅपमन जोडीने डाव सावरला.  24 चेंडूत 39 धावांची खेळी केली. त्यामुळे दहा षटकात 3 गडी बाद 75 धावा केल्या आहेत.

  • 25 Jan 2026 07:30 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडच्या पावर प्लेमध्ये 3 बाद 36 धावा

    न्यूझीलंडने पावर प्लेच्या सहा षटकात 3 गडी गमवून 36 धावा केल्या. डेवॉन कॉनवे, टिम सेपयर्ट आणि रचिन रवींद्र स्वस्तात बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पावरप्लेमध्ये बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे धावगतीला खिळ लागली आहे.

  • 25 Jan 2026 07:27 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला तिसरा धक्का, सायपर्टला पहिल्याच चेंडूवर बुमराहचा दणका

    पावर प्लेचं शेवटचं षटक टाकण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवला. पहिल्याच चेंडूवर त्याने सायपर्टला क्लिन बोल्ड केलं. टिम सायफर्ट 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. सायपर्टच्या रूपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला.

  • 25 Jan 2026 07:11 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा धक्का, डेवॉन कॉनवेनंतर रचिन बाद

    न्यूझीलंडला रचिन रविंद्रच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. रचिन रविंद्रने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या रवि विश्नोईने त्याचा अप्रतिम झेल पकडला. रचिन रविंद्र 4 धावा करून बाद झाला.

  • 25 Jan 2026 07:04 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडची पहिली विकेट, डेवॉन कॉनवे बाद

    डेवॉन कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. पहिल्याच षटकात डेवॉन कॉनवे फक्त 1 धाव करून बाद झाला आहे. हार्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने झेल पकडला. हार्षित राणाने त्याला पाचव्यांदा बाद केलं.

  • 25 Jan 2026 07:01 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: डेवॉन कॉनवे आणि टिम सायफर्ट जोडी मैदानात, पहिलं षटक हार्षित राणाला

    न्यूझीलंडकडून सलामीला डेवॉन कॉनवे आणि टिम सायफर्ट ही जोडी मैदानात उतरले आहेत. तर टीम इंडियाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी हार्षित राणा आला. न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे.

  • 25 Jan 2026 06:36 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडची प्लेइंग 11

    न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमीसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

  • 25 Jan 2026 06:35 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

  • 25 Jan 2026 06:34 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितलं की…

    मिचेल सँटनर म्हणाला की, मला वाटलं की आम्ही खूप चांगली फलंदाजी केली. मागच्या सामन्यातून शिकलेले धडे घ्या आणि ते या सामन्यात वापरा. ​​खूप लवकर पुढे जा. नीश खेळणार आहे.

  • 25 Jan 2026 06:33 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला…

    आपण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकेट चांगली दिसतेय, नंतर दव पडेल. निर्भय राहा, स्वतःचा निर्णय घ्या, आनंद घ्या आणि त्याच वेळी नम्र राहा. दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप आणि वरुण आज रात्री विश्रांती घेत आहेत. बुमराह आणि बिश्नोई यांना संधी मिळाली आहे.

  • 25 Jan 2026 06:31 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, गोलंदाजी घेत प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • 25 Jan 2026 05:33 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग 11

    न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग 11: टिम सेफर्ट, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जॅक.

  • 25 Jan 2026 05:32 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताची संभाव्य प्लेइंग 11

    भारताचे संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

  • 25 Jan 2026 05:31 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?

    दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या संघात पुनरागमनावर सर्वांचे लक्ष असेल. दुसऱ्या टी20 सामन्यात आराम दिल्याने वादाला फोडणी मिळाली होती.

  • 25 Jan 2026 05:01 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडचा संपूर्ण संघ

    न्यूझीलंड संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर (कर्णधार), झकरी फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, काइल जेमिसन, मायकेल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, टिम रॉबिन्सन, बेव्हॉन जेकब्स.

  • 25 Jan 2026 05:00 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताचा संपूर्ण संघ

    भारतीय संघ: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, श्रेयस अय्यर, जसप्रीत पटेल, जसप्रीत बुमराह

Published On - Jan 25,2026 4:59 PM

Follow Us
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....