AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Family Man 2 | लोणावळ्यात नेमकं काय घडलं? बहुचर्चित प्रश्नावर अभिनेत्री प्रियामणीची प्रतिक्रिया…

श्रीकांत आपले ऑपरेशन संपवून चेन्नईहून परत आला, तेव्हापासून सुचीला त्याला काहीतरी सांगायचं आहे. पण जेव्हा तिने तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात आणि ती श्रीकांतला सांगणारच असते, नेमक्या याच प्रश्नावर निर्मात्यांनी सीरीजचा हा सीझन संपवला आहे.

The Family Man 2 | लोणावळ्यात नेमकं काय घडलं? बहुचर्चित प्रश्नावर अभिनेत्री प्रियामणीची प्रतिक्रिया...
प्रियामणी
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 9:26 AM
Share

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईमची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) सुपर हिट ठरली आहे. या सीरीजची स्टारकास्ट देखील या यशावर खूप आनंदित आहे. मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni), प्रियामणी (Priyamani)आणि शरिब हाश्मी यांच्याबरोबरच यातील इतर कलाकारही देशभरात प्रसिद्ध झाले आहेत (The Family Man 2 most popular question what happened in lonavla know the answer from actress Priyamani).

या सीरीजच्या यशानंतर टीव्ही 9ने प्रियामनी म्हणजेच या सीरीजमधील ‘सुची’ची एक विशेष मुलाखत घेतली आहे आणि सध्या चाहत्यांना सर्वात जास्त रस असलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर सगळ्यांनाच तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे. तो प्रश्न म्हणजे ‘लोणावळ्यात सुची आणि अरविंद यांच्यात नेमकं काय घडलं?’

अरविंदचा सुचीवर जडला जीव!

जर, तुम्हाला अद्याप ही सीरीज पाहण्यास वेळ मिळाला नसेल, तर कथेची पार्श्वभूमी अशी आहे की, मुख्य पात्र असणाऱ्या श्रीकांत तिवारीची पत्नी सुची ही गृहिणी आहे आणि ती अरविंदबरोबर त्याच्या कंपनीत काम करते. अरविंदला सुची खूप आवडते आणि ही गोष्ट तिला सांगाताना तो अजिबात मागेपुढे पाहत नाही. नवरा श्रीकांतच्या वागण्याने त्रस्त असलेल्या सुचीलाही अरविंद आवडू लागतो.

दुसर्‍या सीझनच्या सुरूवातीपासूनच, सुची अरविंदपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. पण, जेव्हा तिला श्रीकांतची साथ मिळत नाही, तेव्हा ती पुन्हा अरविंदसोबत ऑफिसमध्ये जायला लागते. या दरम्यान दोघांमधील आकर्षण पुन्हा वाढू लागते. ऑफिसच्या कामासाठी ते दोघे म्हणजेच अरविंद आणि सुची लोणावळ्याला जातात. जिथे असे काहीतरी घडते की,  आता सुचीला ते श्रीकांतला सांगावेच लागेल. कारण, दोघांचे कुटुंब आता तुटण्याच्या मार्गावर आले आहे.

रहस्य उघड होणार का?

श्रीकांत आपले ऑपरेशन संपवून चेन्नईहून परत आला, तेव्हापासून सुचीला त्याला काहीतरी सांगायचं आहे. पण, जेव्हा तिने तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात आणि ती श्रीकांतला सांगणारच असते, नेमक्या याच प्रश्नावर निर्मात्यांनी सीरीजचा हा सीझन संपवला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, पुढील सीझनमध्ये याच प्रश्नावर काही तरी महत्त्वपूर्ण घटना घडणार होईल.

आता, प्रत्येकालाच या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे की, लोणावळ्यात असे काय घडले की आता सुचीला श्रीकांतला ते रहस्य सांगून आपले मन मोकळे करायचे आहे. प्रियामणीने दिलेल्या मुलाखतीत जेव्हा तिला ‘लोणावळ्यात काय घडले?’ हा प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली की, लोणावळ्यात काय घडले याचे उत्तर प्रत्येकालाच मिळणार आहे, पण त्यासाठी त्यांना तिसऱ्या सीझनची वाट बघावी लागेल. तिसर्‍या सत्राच्या सीझनमध्ये निर्मात्यांनी त्यांच्या स्क्रिप्टमध्ये काय लिहिले आहे, हे आताच्या घडीला तिलासुद्धा माहित नाही. मात्र, पुढील सीझनचे शूट पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे.  त्यानंतर सगळ्यांनाच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.  मात्र, याक्षणी तिला याबद्दल काहीच माहिती नाही, असे प्रियामणीने म्हटले आहे.

(The Family Man 2 most popular question what happened in Lonavala know the answer from actress Priyamani)

हेही वाचा :

The Family Man 2 मुळे ज्यांची सर्वाधिक नेटवर चर्चा आहे ते चेल्लाम सर नेमके कोण आहेत?

‘या’ 5 वेब सिरीजमुळे भारतीय मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.