Year Ender 2021 : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडले यंदाचे शो अन् चित्रपट, पाहा संपूर्ण यादी…

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे रिलीज होतात. काही काळापासून ओटीटीवरही अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यासोबतच ओटीटीवर नवीन कंटेंटही पाहायला मिळत आहे. OTT वर अनेक प्रकारचे वेब शो आणि मालिका प्रदर्शित केल्या जातात ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.

Year Ender 2021 : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडले यंदाचे शो अन् चित्रपट, पाहा संपूर्ण यादी...
OTT
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 6:59 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे रिलीज होतात. काही काळापासून ओटीटीवरही अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यासोबतच ओटीटीवर नवीन कंटेंटही पाहायला मिळत आहे. OTT वर अनेक प्रकारचे वेब शो आणि मालिका प्रदर्शित केल्या जातात ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.

त्याचबरोबर असे काही चित्रपट आणि शो आहेत ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. आता आम्ही तुम्हाला या वर्षातील फ्लॉप चित्रपट आणि वेब शो किंवा सीरीजबद्दल सांगणार आहोत…

बंटी और बबली 2

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या वर्षी बंटी और बबली 2 या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटात राणीसोबत सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत होते. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला.

संदीप और पिंकी फरार

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाकडून दोन्ही स्टार्सना खूप आशा होत्या. मात्र या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात अर्जुनने हरियाणवी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, तर परिणीती भूमिका कॉर्पोरेट नोकरी करणाऱ्या मुलीची होती.

चेहरे

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात दोन्ही अप्रतिम कलाकार असूनही तो जादू दाखवू शकला नाही.

मुंबई सागा

जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट पहिल्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात आला. जॉनचा हा चित्रपट दोन्ही ठिकाणी जादू दाखवू शकला नाही.

सरदार का ग्रँडसन

अर्जुन कपूर, नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंह अभिनीत ‘सरदार का ग्रँडसन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. अर्जुनचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

भुज : द प्राईड ऑफ इंडिया

अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही यांचा ‘भुद : द प्राईड’ हा देशभक्तीपर चित्रपट होता, पण तरीही या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सत्यमेव जयते 2

जॉन अब्राहम गेल्या काही काळापासून देशभक्तीपर चित्रपट करत आहे, पण त्याचे चित्रपट काही विशेष जादू दाखवत नाहीत. त्याला या अवतारात पाहून चाहते कंटाळले आहेत. जॉनचा सत्यमेव जयते 2 चित्रपटही फ्लॉप झाला.

द गर्ल ऑन द ट्रेन

हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’मध्ये अभिनेत्रीचा अभिनय चांगला होता, पण त्याची कथा प्रेक्षकांना आवडली नाही. हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

पौरपुरुष

अल्ट बालाजीच्या पौरपुरुष या मालिकेत खूप बोल्ड कंटेंट दाखवण्यात आला होता. असे असूनही तो प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. त्यात शिल्पा शिंदे ते मिलिंद सोमण यांसारख्या स्टार्सचा समावेश होता.

बॉम्बे बेगम

पूजा भट्ट स्टारर ‘बॉम्बे बेगम’मध्ये अनेक महिलांची वेगळी कहाणी दाखवण्यात आली होती. पूजाने या मालिकेद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले, परंतु ही सीरीज फार चालली नाही.

शी

Netflix ची वेब सीरीज ‘शी’ एक क्राईम ड्रामा सीरीज होती. आरिफ अली आणि अविनाश दास दिग्दर्शित ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.

हेही वाचा :

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.