बॉलिवूडचा प्रसिद्ध व्यक्ती माधुरी दीक्षितचा ‘बिग फॅन’; सौंदर्याची भुरळ; तिच्या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करायचा

माधुरी दीक्षितचे किती चाहते आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक चाहता असा होता जो माधुरीच्या प्रेमात अखंड बुडालेला. एवढंच नाही तर तो चाहता तिचे चित्रपट पाहण्यासाठी अख्खं थिएटर बुक करायचा. कोण होता हा चाहता माहितीये? ज्याचं बॉलिवूडमध्येही आहे मोठं नाव.

बॉलिवूडचा प्रसिद्ध व्यक्ती माधुरी दीक्षितचा बिग फॅन; सौंदर्याची भुरळ; तिच्या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करायचा
Painter M.F. Hussain used to book entire theaters to watch Madhuri's films.
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 20, 2025 | 1:35 PM

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची आजही कमतरता नाही. माधुरी दीक्षित फार कमी चित्रपटांमध्ये दिसत असली तरी तिची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. आजही तिचे लाखो चाहते आहेत. आजही लोकं तिच्या अभिनायसह तिच्या सौंदर्यावर देखील भाळतात. पण माधुरी रिअॅलिटी शो, सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चर्चेत असते. चाहत्यांना अपडेट देत असते.

पण फक्त चाहतेच नाही तर अनेक कलाकारही माधुरीसाठी वेडे होते. असाच एक कलाकार जो बॉलिवूडचा महत्त्वाचा भाग होता. माधुरीला पाहाताच हा कलाकार  तिच्या प्रेमात पडला. माधुरीच्या सौंदर्याने या कलाकाराला भुरळ घातली होती. आणि तिचे चित्रपट पाहताना  तासंतास  तिच्याकडे पाहत राहायचा.

माधुरी दीक्षितचा हा चाहता कोण?

माधुरी दीक्षितचा हा चाहता कोणी सामान्य माणूस नव्हता तर देशातील सर्वात लोकप्रिय चित्रकार एम.एफ. हुसेन होते. त्यांनी माधुरी दीक्षितमुळे ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट 73 वेळा पाहिला होता. हुसेन माधुरीचे इतके मोठे चाहते होते की त्यांनी अभिनेत्रीसोबत ‘गज गामिनी’ हा चित्रपटही बनवला होता. हुसेन यांनी अनेक चित्रपटांमध्ये लेखक म्हणूनही काम केलं आहे. जेव्हा त्यांनी माधुरी दीक्षितला पहिल्यांदा चित्रपटात पाहिलं तेव्हा ते तासंतास तिच्याकडे पाहत बसले. माधुरीच्या सौंदर्याने त्याच्यावर जादू केली होती. तिचा चित्रपट पाहण्यासाठी ते संपूर्ण थिएटर बुक करायचे.

तिला पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात पाहिले?

‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपटात हुसेन यांनी पहिल्यांदा माधुरीला पाहिलं. त्यांनी हा चित्रपट 73 वेळा पाहिला आणि माधुरीसोबत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. ‘गज गामिनी’ या चित्रपटात त्यांनी माधुरी दीक्षितला मुख्य अभिनेत्री बनवलं आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही स्वतः केले. त्यांनी कामना चंद्रासोबत हा चित्रपट लिहिला. माधुरीसोबत नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी देखील या चित्रपटात होते, परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. एमएफ हुसेन यांचे 9 जून 2011 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. पण माधुरीच्या चाहत्यांमध्ये त्यांचासारखा चाहता हा कदाचित कोणी झाला असेल.