
Pakistan Maulana on Aishwarya Rai: पाकिस्तानात होत असलेले घृणास्पद कृत्य कायम कोणत्या न कोणत्या मार्गांनी समोर येत असतात, आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्या हिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे… आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी मैलवीने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न कऱण्याची इच्छा व्यक्त केली. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न करेल… असं मैलवी म्हणाला. शिवाय बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिच्याबद्दल देखील मैलानाने मोठं वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडियावर पाकिस्तानी मौलवीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं, तेव्हा पाकिस्तानी मैलवीने असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं… मैलवीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्याच्या चाहत्यांचा पारा चढला आहे.
व्हिडिओमध्ये मौलानांनी उघडपणे सांगितलं, ऐश्वर्या राय हिच्यासोबत निकाह करण्यासाठी तिला धर्म बदलायला लावणार आणि आयेशा राय असं तिचं नाव ठेवणार… यावेळी मौलवी याने राखी सावंत हिचं देखील नाव घेतलं…
मौलवी एका मुलाखतीत म्हणाला, ‘पहिल्यांदा ऐश्वर्या राय हिला मुसलमान करेल… ऐश्वर्या राय या नावापेक्षा आयेशा राय हे नाव लिहियालं चांगलं वाटेल… काही महिन्यांत, त्यांच्याकडून मुफ्ती साहेबांसाठीही एक मेसेज येईल. माझ्या इस्लामचे सौंदर्य म्हणजे अल्लाहकडून येणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाला सहमती देणं.’
पण मुफ्ती साहेब, तुम्ही मुस्लिम नसलेल्या महिलेसोबत लग्न कसं करू शकता? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मौलवी म्हणाला, ‘राखी सावंत तर मुस्लिम आहे… तिचं नाव फातिमा आहे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे…
संतापात एक नेटकरी म्हणाला, ‘आणि याच्यासाठी ऐश्वर्या इस्लाम स्वीकारेल…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वेड्यांचा राजा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आता सलमान खान याला सांगतो…’, सध्या सर्वत्र पाकिस्ताना मौलवीची चर्चा सुरु आहे.