
शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटात झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने नुकतंच दुसऱ्यांदा लग्न केलं. बॉयफ्रेंड सलीम करीमशी तिने निकाह केला. या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ तिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'मेरा शहजादा, सलीम', असं कॅप्शन देत तिने निकाहचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. माहिराने या लग्नात मुलगा अझलानसोबत ग्रँड एण्ट्री केली. आईच्या दुसऱ्या लग्नात अझलान भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं.

माहिराच्या निकाहच्या व्हिडीओमधून अझलान पहिल्यांदा मीडियासमोर आला आहे. इतक्या वर्षांपर्यंत तिने मुलाला चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवलं होतं. माहिराचं पहिलं लग्न 2007 मध्ये पाकिस्तानी अभिनेता आणि दिग्दर्शक अली अस्करीसोबत झालं होतं.

माहिराने 2009 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या सहा वर्षांतच माहिरा आणि अली अस्करी विभक्त झाले. आता आईच्या दुसऱ्या निकाहसमध्ये मुलगा अझलान स्वत: तिला मंचापर्यंत घेऊन जाताना दिसत आहे.

माहिराचा पती सलीम हा फिल्म इंडस्ट्रीतला नाही. तो एक बिझनेसमन असून गेल्या पाच वर्षांपासून माहिराला डेट करतोय. सलीम 'सिम्पैसा' नावाच्या एका प्रसिद्ध स्टार्ट अप कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी 15 पेत्रा जास्त देशांमध्ये विविध क्षेत्रातील मर्चंट्सना सुविधा प्राप्त करून देते. याशिवाय सलीम प्रोफेशनल डीजेसुद्धा आहे.