पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने डिलिट केली ‘ती’ पोस्ट, चर्चांना उधाण

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने का डिलिट केली 'ती' पोस्ट, अनेकांकडून संताप व्यक्त... पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. घटनेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत...

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने डिलिट केली ती पोस्ट, चर्चांना उधाण
| Updated on: Apr 26, 2025 | 10:35 AM

Pahalgam Terror Attack: पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. हल्ल्याचं पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. हल्ल्याचं निषेध करत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींनी देखील तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत. फक्त बॉलिवूडकरांनी नाही तर, अनेक पाकिस्तानी सेलिब्रीटींनी देखील हल्ल्याचा निषेध सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. पण एका पाकिस्तानी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेचा निषेध व्यक्त केला आणि पोस्ट लगेच डिलिट केली. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे.

ज्या अभिनेत्रीने पोस्ट डिलिट केली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री माहिरा खान आहे. 22 एप्रिल रोजी दहशदवाद्यांनी पहलगाम याठिकाणी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर म्हणजे 24 एप्रिल रोजी माहिरा हिने सोशल मीडियावर पोस्ट केली. पण पोस्ट अभिनेत्रीने लगेच डिलिट देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

पोस्ट शेअर करत माहिरा म्हणाली होती की, ‘जगात कुठेही, कोणत्याही प्रकारची हिंसा म्हणजे भेकट कामगिरी आहे. पहलगाममधील हल्ल्यात प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना…’ अशी पोस्ट अभिनेत्री केली होती. पण लगेच डिलिट देखील केली. अभिनेत्रीने पोस्ट डिलिट का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सोशल मीडियावर माहिरा तुफान ट्रोल होत आहे.

माहिरा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, भारतात देखील माहिराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे… असं म्हणायला हरकत नाही. कारण अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘रईस’ सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिस हीट ठरला. शिवाय सिनेमातील गाण्यांना देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

पाकिस्तानी सेलिब्रिटींकडून घटनेचा निषेध

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान म्हणाला, ‘पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून फार वाईट वाटलं आहे. हल्ल्यात प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या कठीण कामय पीडितांच्या कुटुंबासाठी शक्ती आणि जखमींसाठी प्रार्थना करत आहोत…’ पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली असून घटनेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत.