वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीची हत्या, सेलिब्रिटीने भोगली जन्मठेपेची शिक्षा, हैराण करणारं प्रकरण
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या लेकीची 'या' सेलिब्रिटीने जेव्हा गोळ्या झाडून केली हत्या, भोगली जन्मठेपेची शिक्षा, तेव्हा नक्की झालं तरी काय होतं? फार कमी लोकांना माहिती आहे वास्तव...

एक काळ असा होता जेव्हा नवाब यांच्यामुळे हीरामंडीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. जेथे तवायफ महिला मुजरा सादर करत पुरुषांना घायाळ करायच्या. त्याच हीरामंडीमधून अनेक अभिनेत्री हिंदी सिनेविश्वाला भेटल्या. ज्या नृत्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे असं समजणाऱ्या महिलांच आयुष्य त्याच नृत्याने बदललं. पण त्यांना अनेक संकटांचा देखील सामना करावा लागला. असंच काही अभिनेत्री निग्गो हिच्यासोबत देखील झाली. पाकिस्तानी नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून निग्गो त्याकाळी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होती.
निग्गोचं खरं नाव होतं नरगिस बेगम, जिचा जन्म लाहोरच्या कुप्रसिद्ध रस्त्यांवर झाला होता जिथे हारामंडी हा रेड लाईट एरिया खूप प्रसिद्ध होता. हे पूर्वी वेश्यांचं ठिकाण होतं. निग्गोच्या आईचाही हाच व्यवसाय होता. संपूर्ण कुटुंब महफिल आणि मुजरा यांच्या मदतीने घर चालवत असे.
असं म्हणतात की तेव्हा निग्गो लोकप्रिय डान्सर होती. तिचा मुजरा पाहण्यासाठी अनेक मोठा नवाब कोठ्यावर यायचे. एके दिवशी असं झालं की, प्रसिद्ध निर्माते त्या रस्त्याने जात तेव्हा त्यांनी निग्गो यांनी मुजरा करताना पाहिलं आणि सिनेमात काम करणार का असं विचारलं.




निग्गो यांनी आपल्या नृत्य कौशल्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आणि सर्वात महागडी आयटम गर्ल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. निग्गो यांनी 100 पेक्षा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इशरत’ सिनेमातून निग्गो यांनी झगमगत्या विश्वात पदार्पण केलं.
1971 मध्ये ‘कासू’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान निग्गो यांची ओखळ निर्माते ख्वाजा मजहर यांच्यासोबत झाली. पहिल्या ओळखीनंतर दोघांचा एकमेकांवर जीव जडला आणि दोघांनी लग्न केलं. पण निग्गो यांच्या आईला लेकीचं लग्न मान्य नव्हतं. कारण वेश्या असणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कधीच प्रेम नसतं.. असं निग्गो यांच्या आईचं म्हणणं होतं.
लग्नानंतर निग्गो यांनी परत कोठ्यावर यावं आणि आपलं घर सांभाळावं… असं अभिनेत्रीच्या आईची इच्छा होती.एकदा तर निग्गो यांच्या नवऱ्याकडून आई-वडिलांनी मोठी रक्कम देखील मागितली. पण जेव्हा अभिनेत्री घरी परतलीच नाही, तेव्हा निग्गोच्या आईने आजारी पडण्याचं नाटक केलं आणि अभिनेत्रीला बोलावून घेतलं.
आई आजारी असल्याचं कळताच निग्गो हीरामंडी पोहोचल्या. त्यानंतर निग्गो यांच्या आई – वडिलांना अभिनेत्रीला नवऱ्याकडे जाऊ दिलं नाही. अनेक दिवस झाले तरी निग्गो घरी परतली नाही म्हणून निर्माते मजहर ख्वाजा पत्नीला आणण्यासाठी हीरामंडीमध्ये गेले.
पण अभिनेत्री नवऱ्यासोबत येण्यास तयारच नव्हती. मजहर ख्वाजा यांनी पत्नीची समज देखील काढली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर वाद टोकाला पोहोचला आणि मजहर ख्वाजा यांनी बंदूक काढली आणि निग्गोवर गोळ्या झाडल्या. अशात निग्गोला वेदनादयाक मरण आलं आणि मजहर ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली.