भूमिकेसाठी ओलांडल्या मर्यादा, दिग्दर्शकाच्या मागणीवर अभिनेत्री हैराण; म्हणाली, खरंच लघवी…
Bollywood Actress: भूमिका साकारताना अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा...., दिग्दर्शकाने केलेल्या 'त्या' मागणीनंतर अभिनेत्रीला बसला मोठा धक्का; म्हणाली, 'खरंच लघवी...', अभिनेत्री कायम असते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत...

Bollywood Actress: अभिनेता अजय देवगन आणि आर माधवन यांचा सिनेमा जो पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील हैराण झाले. सिनेमाच्या दिग्दर्शकाने सिनेमाच्या एका सीनसाठी अभिनेत्रीकडे अशी मागणी केली ज्यामुळे अभिनेत्री देखील थक्क झाली. खरंतर सर्वांसमोर असा सीन शूट करणं फार कठीण होतं आणि अशक्य देखील होतं. पण असं असताना देखील सीन शूट झाला. तर तो सीन कोणता होता आणि कोणत्या अभिनेत्रीने केला… जाणून घ्या…
असा एक सिनेमा ज्यामध्ये अजय देवगन आणि आर माधवन यांचा जबरदस्त अभिनय चाहत्यांना अनुभवता आहे. पण सिनेमातील अभिनेत्री देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांना थक्क केलं. सिनेमाचं नाव ‘शैतान’ असं आहे. सिनेमात अभिनेत्री जानकी बोदीवाला मुख्य भूमिकेत होती.




एका मुलखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं एक सीन आहे ज्यासाठी तुला कपड्यांमध्ये लघवी करावी लागेल… असा सीन तुला जमेल का?’ सिनेमात एक सीन आहे, ज्यामध्ये एका तांत्रिकाच्या ताब्यात असलेली जान्हवी इतकी असहाय्य आहे की ती तिच्या कपड्यांमध्ये लघवी करते.
View this post on Instagram
या सीनसाठी दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी अभिनेत्रीला विचारलं होतं की, सीनसाठी तिच्या कपड्यांमध्ये लघवी करू शकते का? अभिनेत्रीने यावर लगेच सहमती दर्शवली कारण तिच्या मते, ही एक अभिनेत्री म्हणून एक अनोखी संधी होती. पण सीनच्या शुटिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अनेक अडचणी समोर अल्या.
सीन करण्यासाठी अभिनेत्री उत्सुक होती, पण मोठ्या पडद्यावर सीन करणं कठीण होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमातील तो सीन म्हणजे माझ्यासाठी नवी संधी होती. पण सीन वाटत होता तेवढा सोपा देखील नव्हता. अनेक रीटेक घ्यावे लागले. जे सेटवर अशक्य होतं. त्यामुळे आम्ही दुसरा पर्याय शोधून काढला…’
सांगायचं झालं तर, सीनसाठी अखेर सिमुलेशनचा वापर करण्यात आला. ज्यामुळे सीनमध्ये खरंच लघवी केली आहे… असं वाटेल. ‘शैतान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली.