Palak Tiwari: पलक तिवारीच्या रॅम्प वॉकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा Video

Palak Tiwari: पलक तिवारीच्या रॅम्प वॉकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा Video
Palak Tiwari
Image Credit source: Instagram

नेटकऱ्यांनी तिला तिच्या रॅम्प वॉकवरून ट्रोल केलं आहे. इतकंच नव्हे तर तिने अभिनेत्री नोरा फतेहीकडून रॅम्प वॉकचे धडे घ्यावेत, असाही सल्ला काहींनी तिला दिला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 25, 2022 | 5:47 PM

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही अलीकडच्या काळात सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. पलक तिच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच तिने दिल्ली फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक (Ramp Walk) केला. तिच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. नेटकऱ्यांनी तिला तिच्या रॅम्प वॉकवरून ट्रोल केलं आहे. इतकंच नव्हे तर तिने अभिनेत्री नोरा फतेहीकडून रॅम्प वॉकचे धडे घ्यावेत, असाही सल्ला काहींनी तिला दिला. दिल्ली फॅशन वीकच्या रॅम्पवॉकसाठी पलकने काळ्या रंगाचे पँट्स आणि जॅकेट असा लूक केला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ‘याला रॅम्प वॉक म्हणायचं का’, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘यापेक्षा नोरा फतेहीचा एअरपोर्ट वॉक चांगला असतो.’ ‘तुला रॅम्प वॉक कसं करतात ते शिकायची गरज आहे’, अशाही शब्दांत एका युजरने ट्रोल केलं.

काही दिवसांपूर्वीच पलकच्या करिअरमधील पहिला म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याच्या व्हिडीओमध्ये ती झळकली. हे गाणं तुफान हिट झालं. दरम्यानच्या काळात तिला सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानसोबत एक रेस्टॉरंटबाहेर पाहिलं गेलं. त्यावेळी पलकने पापाराझींपासून तोंड लपवण्याचा प्रयत्न केला होता. पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा होती. मात्र पलकने नंतर या चर्चा फेटाळून लावल्या.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

पलकला अनेकदा बारिक दिसण्यावरूनही ट्रोल केलं जातं. तिला ट्रोल करणाऱ्यांना तिची आई श्वेता तिवारीने सडेतोड उत्तर दिलं. “अनेकजण म्हणतात ती खूप सुंदर दिसते. पण मी तिला कधीच काही बोलत नाही. माझ्यासाठी ती निरोगी आणि स्वस्थ असणं अधिक गरजेचं आहे. जोपर्यंत ती ठीक आहे, तोपर्यंत मी इन्स्टाग्रामवरील कमेंट्सकडे लक्ष देत नाही”, असं ती म्हणाली. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें