
बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना सुरवातीला त्यांच्या घरच्यांकडून पॉकीटमनी मिळत असे किंवा त्यांना खर्चाला पैसे मिळत असे. तर काही सेलिब्रिटींनी त्यांचे आई-वडील किती स्ट्रिक्ट होते याबद्दलही सांगितलं आहे. त्यातीलच एक अशी अभिनेत्री तथा सेलिब्रिटी किड्सही आहे जिची आई तिला आजही खर्चासाठी पैसे देते. किंवा तिचा सर्व जमा-खर्च मॅनेज करते.तसेच या अभिनेत्रीला भांडी आणि बाथरूम धुतल्यावर तिला पैसे मिळायचे. एवढंच नाही तर तिला तिच्या आईकडून पॉकेटमनी मिळवण्यासाठी भांडी धुवावी लागायची आणि कधीकधी बाथरूम साफ करावे लागत होते. नक्की हा काय प्रसंग आहे ते जाणून घेऊयात.
सेलिब्रिटी स्टारकिडला पॉकिटमनीसाठी करावी लागतात कामं
ही सेलिब्रिटी स्टारकिड आहे अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी. जिने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. खरंतर, श्वेता अलीकडेच भारती सिंगच्या पॉडकास्टवर दिसली. जिथे तिने पलकबद्दल तसेच तिच्या संगोपनाबद्दल अनेक मोठे खुलासे केले. यादरम्यान तिने अभिनेत्रीच्या पॉकेट मनीशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला.
भांडी आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी पैसे मिळाले
श्वेता तिवारी म्हणाली की, मी माझ्या मुलांना पैशाचे मूल्य शिकवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. मी नेहमीच पलकसाठी बजेट ठरवले आहे. जसे तिचे बजेट 25,००० रुपये आहे आणि जर तिला हे पैसे हवे असतीलतर तर तिला घरातील कामे करून त्याची भरपाई करावी लागत असे.जसं की श्वेताने तिला सांगितलं होतं की तुझ्या बेडरुममधील बाथरुम साफ केलं तर ती 1000 रुपये मिळत असे, बेड साफ केला तर 500 रुपये मिळायचे आणि भांडी घासली तर तिला 1000 रुपये मिळायचे. जेव्हा जेव्हा तिला बजेटपेक्षा जास्त खर्च करावा लागत असे तेव्हा पलक अतिरिक्त काम करायची जेणेकरून तिला त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळायचे.
मुलीसाठी बनवलेत काही नियम
श्वेता तिवारीने असेही सांगितले की तिने घरात पलकसाठी नियम बनवले आहेत. ती कुठेही गेली तरी तिला 11 वाजेपर्यंत घरी परतावे लागते. याशिवाय श्वेताकडे पलकच्या मित्र-मैत्रिणींचे नंबरही आहेत. किंवा आताही पलक कुठेही शुटींगला गेली तरी तिथले सर्व नंबर्स, पत्ता वैगरे श्वेता घेऊन ठेवते. तसेच पलकला कार किंवा ड्रायव्हर उपस्थित नसेल तर ऑटो किंवा ओलाने वैगरे ट्रॅव्हल करायला तिने शिकवले आहे.ॉॉ