
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Mucchal) याचं ठरलेलं लग्न अचानक मोडलं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने ते पुढे ढकलण्यात आल होतं. त्या दरम्यान पलाशने स्मृीताल फसवल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, अखेर काही दविसांन खुद्द स्मृती हिनेच सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटवरून लग्न मोडल्याची घोषणा केली. यामुळे मोठी खळबळ माजली. गेल्या काही काळापासून पलाश मुच्छल हा सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असून अनकेदा दो वादातही सापडला आहे. लग्न मोडल्यानंतर आता तो पुन्हा चर्चेत आला. त्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप स्मृतीचा मित्र विज्ञान माने याने लावला आहे. पलाश मुच्छलने 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्याच विज्ञान माने याने स्मृती पलाशच्या मोडलेल्या लग्नाबद्दल मोठा गौप्यस्फोटही केला आहे.
पलाशने स्मृतीची केली फसवणूक ?
34 वर्षीय विद्यान माने याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हा धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, ” मी लग्नाच्या तयारीदरम्यान (23 नोव्हेंबर 2025) उपस्थित होतो. मात्र तेव्हाच तो ( पलाश मुच्छल) दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडला गेला. ते एक भयानक दृश्य होते; स्मृतीच्या सहकारी मैत्रिणींनी, भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चांगला चोप ददिला. संपूर्ण कुटुंब चिंध चोर आहे. मला वाटलं होतं की तो लग्न करून सांगलीत सेटल होईल, पण सगळं उलट झालं” असं त्याने सांगितलं.
तो पुढे म्हणाला, “गेल्या महिन्यात जेव्हा मी त्याच्या आईला (अमिता मुच्छल) भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की, चित्रपट प्रदर्शित करण्याचे बजेट आता 1.5 कोटी रुपये झाले आहे. त्यांनी मला आणखी 10 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले, अन्यथा मला एकही पैसे परत मिळणार नाहीत. त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी दिली. म्हणूनच मला तक्रार दाखल करावी लागली” असंही विज्ञान याने सनमूद केलं.
मुच्छल कुटुंब करतंय ब्लॅकमेल
पुढे त्याने पलाशवरील अनेक आरोप केले. मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा अनेक प्रयत्न केले, मात्र तरीही मला पलाश मुच्छलकडून थेट प्रतिसाद मिळाला नाही, असं विज्ञान याने सांगितलं. ” ( स्मृती-पालशचं) लग्न मोडल्यानंतर कुटुंबाने मला सर्वत्र ब्लॉक केले. तेव्हा मला कळलं की चित्रपटातील इतर कलाकारांनाही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. मी चित्रपट उद्योगात दिग्दर्शक निर्मात्यांना फसवण्याच्या कथा ऐकल्या आहेत, पण ही पूर्णपणे चोरी आहे” अशा उद्विग्न शब्दांत त्याने टीका केली.
मला मुच्छल कुटुंबाकडून धमक्या येत आहेत, ज्यात मला चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे असा दावाही विद्यान माने याने पुढे केला. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार असूनही, प्रोजेक्टमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही असा आरोपही त्याने केला. आता यावर पुढचं पाऊल काय असेल असं त्याला विचारण्यात आलं असता, तो म्हणाला की मुच्छल कुटुंबाबद्दलचे सत्य उघड करण्याची योजना आखत आहे “माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. यामध्ये माझे चॅट्स आणि फोन कॉल्स समाविष्ट आहेत, जे मी पोलिस आणि मीडियासोबत शेअर करण्यास तयार आहे.” असंही तो म्हणाला.
पलाशने दिलं उत्तर
दरम्यान विज्ञान मानेने पलाशने 40 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर आता पलाश मुच्छलने उत्तर दिले आहे. यानंतर पलाशने या प्रकरणावर आपले मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पलाशने हे आरोप फेटाळून लावले असून कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. पलाश मुच्छलने इंस्टाग्रामवर विज्ञान मानेच्या आरोपांबाबत एक स्टोरी शेअर केली. यामध्ये, पलाशने विज्ञान मानेचे आरोप फेटाळले आहेत, तसेच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. , “सांगलीच्या विज्ञान माने याने केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. हे केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्याला मी आव्हान न देता सोडणार नाही. माझे वकील, श्रेयांश मितारे हे प्रकरण हाताळत आहेत आणि आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून योग्य उत्तर देऊ.” असं त्याने स्टोरीमध्ये नमूद केलं आहे.