
Panchayat Fame Sunita Rajwar: ‘पंचायत’ सीरिजच्या सर्वच भागांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात स्वतःची खास जागा निर्माण केली आहे. सीरिजमध्ये क्रांती देवी ही भूमिका साकारणाऱ्या आभिनेत्री सुनीता राजवर हिला देखील चाहत्यांकडून भरभरुन प्रेमे मिळत आहे. सीरिजनंतर सुनीता हिच्या लोकप्रियेत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सुनीता हिने इंडस्ट्री आणि सेट होणाऱ्या अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला आहे.
सुनीता म्हणाली, सेटवर काही कलाकारांना प्राण्यांसारखी वागणूक दिली जाते. काही कलाकार निर्मात्यांना सहज मिळतात आणि ते कमी पैशांमध्ये काम करण्यासाठी देखील तयार होतात. कारण प्रत्येकावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. पोट भरण्यासाठी सर्वकाही करावं लागतं. याच कारणामुळे छोट्या कलाकारांनी इतरांपेक्षा कमी मान मिळतो.’
‘मोठ्या प्रमाणत भेदभाव होतो. प्रसिद्ध अभिनेत्यांच्या सोयीनुसार सर्व गोष्टी घडत असतात. पण इतर कलाकारांना बाजूला केलं जातं. अशा कालाकारांना प्रोजेक्टमध्ये काम देणं निर्मात्यांसाठी सोयीचं असतं. कालाकार देखील मिळत ते काम करतात. कारण पोटासाठी गप्प राहून सर्वकाही सहन करावं लागतं..’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या कलाकाराचा सीन नाही आहे, तर त्याला गरज असेल तेव्हा बोलवा, आधिच त्या बोलवून बसून ठेवण्याची काहीही गरज नाही. दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आमच्यासोबत अन्याय होती. मुख्य सेलिब्रिटींना सर्व सोयी असतात.’
‘मुख्य सेलिब्रिटींच्या खोल्या स्वच्छ असतात. त्यांच्या रुममध्ये फ्रिज आणि मायक्रोवेव देखील असतो. आमच्या सारख्या कलाकारांनी छोटी खोली दिली जाते. ती देखील स्वच्छ नसते. 3-4 लोकांना त्या खोलीत बसवून ठेवलेलं असतं. रुममधील बाथरुम स्वच्छ नसतो. मळलेली बेडशीट… हे सर्व पाहिल्यानंतर प्रचंड वाईट वाटतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पंचायत सीरिजबद्दल सांगायचं झालं तर, या सीरिजमुळे अनेक कलाकारांच्या करीयरला नवी दिशा मिळाली आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सीरिजमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. ‘पंचायत’ सीरिजनंतर नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत पण त्याआधी नीना गुप्ता यांनी देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला आहे.
‘बधाई हो’ सिनेमात दमदार भूमिका साकारल्या नंतर नीना गुप्ता यांचं करीयर वेगळ्याच उंचीवर येवून पोहोचलं आहे. सोशल मीडियावर देखील नीना गुप्ता कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.