
धक्कादायक सत्य म्हणजे अनेक सेलिब्रिटींचं निधन कॅन्सरमुळे झालं आहे. आता पुन्हा कॅन्सरमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते पण कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अखेर वयाच्या 68 व्या वर्षी पंकज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर पंकज धीर यांना पुन्हा कॅन्सर झाल्याचं समोर आले. अनेकदा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये असं घडतं. उपचार किंवा शस्त्रक्रियेनंतर, कॅन्सरची लक्षणं काही काळासाठी बरी होतात, परंतु नंतर “कॅन्सर रीकरेन्स” च्या स्वरूपात परत येतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कधीकधी, शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीनंतरही, काही कॅन्सरच्या पेशी शरीरात लपून राहतात. कालांतराने, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे, या पेशी पुन्हा सक्रिय होतात आणि कॅन्सर परत येण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, निरोगी आणि आरोग्यास लाभदायक पदार्थ खाल्ले पाहिजे. डॉक्टरांनी जंक फूड आणि पॅकेज्ड फूड टाळण्याचा सल्ला दिला…
शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी: शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीनंतरही जर काही पेशी शरीरात राहतात. कालांतराने त्या पेशी पुन्हा सक्रिय होतात.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती: बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरु असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते.
कॅन्सरचे प्रकार आणि टप्पा: काही प्रकारचे कॅन्सर (जसं की मूत्राशय, स्तन किंवा कोलन कर्करोग) पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते, विशेषतः जर ते स्टेज 3 किंवा 4 असेल तर…. एवढंच नाही तर, धूम्रपान, अस्वस्थ खाण्याच्या सवयी किंवा अनुवांशिक पूर्वस्थिती यामुळे देखील कर्करोग परत येण्याचा धोका अधिक असतो.
कॅन्सर पुन्हा कधी होऊ शकतो?
एकदा कॅन्सरवर उपचार झाल्यानंतर कॅन्सर पुन्हा काही महिन्यांनंतर परत डोकंवर काढू शकतो. डॉक्टरांनी याचे तीन भागांमध्ये विभाजन केलं आहे. लोकल रीकरेन्स म्हणजे, त्याच जागी पुन्हा कॅन्सर होणे, रीजनल रीकरेन्स म्हणजे जवळच्या लिम्फ नोड्समध्ये पसरणे आणि डिस्टेंट रीकरेन्स शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणे.