
महाभारतात कर्णाची भूमिका साकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच त्या भूमिकेला आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात जपणारे अभिनेते पंकज धीर आता आपल्यात नाहीत. वयाच्या 68 व्या वर्षी ते कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने नक्कीच सर्वांना धक्का बसला. सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक जवळच्या मित्रांनी देखील त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट केल्या आहेत.
पंकज धीर कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. या आजारामुळे अभिनेत्याला शस्त्रक्रियाही करावी लागली होती. मात्र अखेर याच आजाराने पंकज धीर यांचे निधन झाले. पंकज यांनी बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
पंकज यांची इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट चर्चेची ठरली
पंकज धीर हे सोशल मीडियावर फार काही सक्रिय नव्हते. अगदी मोजकेच फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. त्यापैकी एका फोटोची सध्या चर्चा होताना दिसत आहे. जो की त्यांचा तो शेवटचा फोटो असल्याचं समोर आलं.त्यांनी शेअर केलेला हा फोटो म्हणजे त्यांच्या इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट ठरली.
त्यांची पहिली पोस्ट होती 9 मे 2020 शेअर केलेली
ते फारच कमी सोशल मीडियावर असायचे. इंस्टाग्रामवरही त्यांनी काहीच पोस्ट केल्या आहेत. त्यांची पहिली पोस्ट 9 मे 2020 रोजी होती, जिथे त्यांनी त्यांच्या तरुणपणातील एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी अशा आठवणींच्या बरेच फोटो टाकले. महाभारतातील त्यांनी साकारलेल्या भूमिकेची देखील त्यांनी पोस्ट शेअर केला आहे. ही पोस्ट म्हणजे महाभारतातील कर्ण त्याच्या साथीदारासोबत हसत आणि पोज देताना दिसत आहे. हा फोटो त्यांना पोस्ट केला आहे.
तर, शेवटचा फोटो या खास व्यक्तीसोबत
दरम्यान आता त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 16 जून 2024 रोजी होती. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो एका खास व्यक्तीसोबतचा आहे म्हणजे त्यांच्या पत्नी अनिता धीरसोबतचा. दरसम्यान या फोटोनंतर त्यांनी कोणतीही इंस्टाग्राम पोस्ट केलेली नाही. त्यांनी इंस्टाग्रामवर एकूण आठ पोस्ट केलेल्या आहेत. पंकज यांना इंस्टाग्रामवर 8000 हून अधिक लोक फॉलोअर्स आहेत.
पंकज आणि अनिता यांचा 49 वर्षांचा सहवास संपला
पंकज आणि अनिता यांनी 49 वर्ष एकमेकांसोबत घालवली. पंकज आणि अनिता यांनी 19 ऑक्टोबर 1976 रोजी लग्न केले होते. त्यांचा 49 वा लग्नाचा वाढदिवस चार दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता.पण त्याआधीच पंकज यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं जाणं नक्कीच सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलं आहे.