AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात…’, राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर Parineeti Chopra हिचं स्पष्टीकरण

खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर पहिल्यांदा व्यक्त झाली अभिनेत्री परिणीती चोप्रा... सध्या सर्वत्र राघव - परिणाती यांच्या नात्याचीच चर्चा...

'जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात...', राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर Parineeti Chopra हिचं स्पष्टीकरण
| Updated on: Apr 19, 2023 | 12:10 PM
Share

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांना एकत्र हॉलेटबाहेर स्पॉट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघे रिलेशनशिपमध्ये असलेल्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेकदा दोघांना नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. पण आता परिणीती हिने राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर परिणीती चोप्रा पहिल्यांदा व्यक्त झाली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने राघव यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर परिणीती चोप्रा म्हणाली, ‘माध्यमांमध्ये सध्या माझ्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. पण कधी-कधी खासगी आयुष्यावर रंगणाऱ्या चर्चांबाबत जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा त्यामध्ये एक रेखा तयार होते. याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि आपमान करणं यामध्ये एक लहान रेखा आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाले, ‘एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यायचं नसेल तर मी देणार नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली, पण यावेळी अभिनेत्रीने खासदार राघव चड्ढा यांचं नाव घेतलं नाही.. दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांची लग्नाची तयारी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर चर्चांनी अधिक जोर धरला.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.

परिणीती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?