Pathaan: शाहरुख-दीपिकाचा ‘पठाण’ फक्त 55 रुपयांमध्ये पाहता येणार; जाणून घ्या कसं..

प्रेक्षकांची मागणी पाहता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत दिवसेंदिवस वाढतेय. दिल्लीतील काही थिएटर्समध्ये या चित्रपटाच्या तिकिटांची रक्कम ही 2100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Pathaan: शाहरुख-दीपिकाचा 'पठाण' फक्त 55 रुपयांमध्ये पाहता येणार; जाणून घ्या कसं..
PathaanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 2:37 PM

हैदराबाद: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. शाहरुख, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने विविध कारणांमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रेक्षकांची मागणी पाहता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत दिवसेंदिवस वाढतेय. दिल्लीतील काही थिएटर्समध्ये या चित्रपटाच्या तिकिटांची रक्कम ही 2100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

शाहरुखच्या कमबॅकचा हा चित्रपट तुम्हाला खिशाला कात्री न लावता पाहायचा असेल, तर यासाठी आणखी एक सहज सोपा मार्ग आहे. ‘पठाण’ हा चित्रपट तुम्हाला अवघ्या 55 रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे.

‘पठाण’च्या तेलुगू डबिंग व्हर्जनची तिकिटं ही 55 रुपयांना विकली जात आहेत. मात्र त्यासाठी एक अट आहे. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमी किंमत मोजायची असेल तर तुम्हाला ही अट पाळावी लागणार आहे. तुम्ही हैदराबादचे रहिवाशी असाल आणि तेलुगू डबिंग व्हर्जन पाहण्याची तुमची तयारी असले तर अवघ्या 55 रुपयांमध्ये ‘पठाण’ पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

हैदराबादमधील देवी 70MM 4K Laser आणि RTC X Roads वरील डॉल्बी अटमॉसमध्ये ‘पठाण’ची तिकिटं 55 रुपयांना विकली जात आहेत. दुसरीकडे दिल्लीतील काही मल्टिप्लेक्समध्ये पठाणची तिकिटं 2100 रुपयांसाठी असताना, करोल बाग लिबर्टी सिनेमामध्ये 85 रुपयांना 2D नॉन आयमॅक्स व्हर्जनमध्ये चित्रपट दाखवला जाणार आहे.

मुंबईत ‘पठाण’च्या तिकिटांची किमान रक्कम ही 180 रुपये आहे, तर कोलकातामध्ये कमीत कमी 200 रुपयांना चित्रपटाचं तिकिट उपलब्ध आहे. परदेशात पठाणची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. या बुकिंगचे आकडे पाहता ‘पठाण’ची ओपनिंग जबरदस्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.