Pathaan: जबरदस्त ओपनिंगसाठी ‘पठाण’ तयार; परदेशात जोरदार ॲडव्हान्स बुकिंग; मोडला KGF 2 चा विक्रम

'पठाण'ची ॲडव्हान्स बुकिंग अद्याप भारतात सुरू झाली नाही. मात्र परदेशांमध्ये या चित्रपटाची मर्यादित ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या बुकिंगचे आकडे पाहता 'पठाण'ची ओपनिंग जबरदस्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Pathaan: जबरदस्त ओपनिंगसाठी 'पठाण' तयार; परदेशात जोरदार ॲडव्हान्स बुकिंग; मोडला KGF 2 चा विक्रम
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 9:39 AM

मुंबई: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमधील शाहरुखचा नवा अवतार पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक झाले होते. आता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित जाला. यामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दमदार ॲक्शन अंदाजात दिसले.

‘पठाण’ची ॲडव्हान्स बुकिंग अद्याप भारतात सुरू झाली नाही. मात्र परदेशांमध्ये या चित्रपटाची मर्यादित ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या बुकिंगचे आकडे पाहता ‘पठाण’ची ओपनिंग जबरदस्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शाहरुख खानला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय इंटरनॅशनल चेहरा मानलं जातं. परदेशात होणाऱ्या ‘पठाण’च्या ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांवरून त्याच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.

रिपोर्ट्सनुसार, कन्नड सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ने जर्मनीमध्ये 144 हजार युरो म्हणजेच जवळपास 1.2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर गेल्या वर्षांतील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ने जर्मनीत 155 हजार युरोंची (जवळपास 1.36 कोटी रुपये) कमाई केली होती. आता शाहरुखच्या ‘पठाण’ची जर्मनीतील ॲडव्हान्स बुकिंगच 150 हजार युरोंवर (जवळपास 1.32) पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून 10 दिवस बाकी आहेत. तरीसुद्धा ‘केजीएफ 2’चं जर्मनीत लाइफटाइम कलेक्शन जेवढं झालं होतं, तेवढी कमाई ‘पठाण’च्या ॲडव्हान्स बुकिंगमधून झाली आहे. शाहरुखच्या ‘दिलवाले’ (2016) या चित्रपटाने जर्मनीत पहिल्या वीकेंडला जवळपास 143 हजार युरोंची (जवळपास 1.25 कोटी रुपये) कमाई केली होती.

अमेरिकेतही शाहरुखच्या चित्रपटांचे असंख्य चाहते आहेत. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत ‘पठाण’चे जवळपास 23 हजार तिकिटं विकली गेली आहेत. म्हणजेच प्रदर्शनाच्या 10 दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंगद्वारे ‘पठाण’ने 350 हजार डॉलर (जवळपास 2.8 कोटी रुपये) कमावले आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 80 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (45 लाख रुपयांहून अधिक) कमावले आहेत.

परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाचा समावश आहे. या चित्रपटाने 13.73 दशलक्ष डॉलर (111 कोटी रुपये) कमावले होते. ‘पठाण’ने यापेक्षा अधिक कमाई केली तर शाहरुखसाठी यापेक्षा दमदार कमबॅक काही होऊच शकत नाही.

परदेशात जबरदस्त वीकेंडची कमाई करणारे टॉप 5 बॉलिवूड चित्रपट-

1- सुलतान- 13.73 दशलक्ष डॉलर (111.60 कोटी रुपये) 2- पद्मावत- 12 दशलक्ष डॉलर (97.54 कोटी रुपये) 3- धूम 3- 10.2 दशलक्ष डॉलर (82.91 कोटी रुपये) 4- दंगल- 9 दशलक्ष डॉलर (73.15 कोटी रुपये) 5- प्रेम रतन धन पायो- 8.9 दशलक्ष डॉलर (72.34 कोटी रुपये)

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.